सोलापूर : टोळी (ता. परोळा, जि. जळगाव ) येथील चर्मकार समाजातील २० वर्षीय विद्यार्थिनीवर काही तरुणांनी अत्याचार करून तिला विष पाजून हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रीय चर्मकार महासंघ सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आज गुरुवारी दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पूर्णाकृती पुतळ्यासमोर त्या पीडित मुलीवर श्रद्धांजली वाहिली. यातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी जिल्हाधिका-यांना निवेदन देऊन करण्यात आली.
या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा, महिला आरोपीसह अन्य आरोपींना तत्काळ अटक करावी, संबंधित स्थानिक पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे, निकाल लागेपर्यंत त्यामधील आरोपींना जामीन देण्यात येऊ नये, मुलीच्या कुटुंबाचे संरक्षण मिळावे आणि पुनर्वसन करावे या मागण्या निवेदनाद्वारे केल्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी संघटनेचे संजय शिंदे , नगरसेविका श्रीदेवी फुलारी, जिल्हा अध्यक्ष अजय राउत, प्रदेश कोषाध्यक्ष प्रशांत कांबळे, प्रदेश युवक कार्याध्यक्ष राम कबाडे, शहर अध्यक्ष परशुराम मब्रुखाने, गणेश तुपसमुद्रे, जिल्हा सचिव वसंत कांबळे, तानाजी जाधव,रमेश कांबळे, धनराज शिंदे, इस्माइल हुलसूरे, राजेंद्र कांबळे, अरविंद तळे,परशुराम वनके, अक्षय कांबळे, गणेश शिलेदार, ज्योतिराम कांबळे, तानाजी कांबळे,रमेश गायकवाड,संजय थोरात,सागर टोनपे, गौराबाई कोरे,मार्ता आसादे, कविता कोडवान, काशिनाथ काळे, विठ्ठल व्हनसकर,
तुकाराम चाबुकस्वार, सचिन ईरवाडकर, लक्ष्मण कांबळे, शिवाजी राजगुरू, वैभव कांबळे, उमेश वाघमारे, दादा बनसोडे, आनंद सोनटक्के आदींसह जिल्ह्यातील चर्मकार बांधवांची उपस्थित उपस्थिती होती.