Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दररोज दोन हजार भाविकांना मिळणार विठ्ठलाचे दर्शन, उद्यापासून अंमलबजावणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

दररोज दोन हजार भाविकांना मिळणार विठ्ठलाचे दर्शन, उद्यापासून अंमलबजावणी

Surajya Digital
Last updated: 2020/11/17 at 7:27 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

पंढरपूर : दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल रक्मिणी मंदिर भाविकांसाठी खूले करण्यात आले आहे. भाविकांची वाढती गर्दी व मागणी लक्षात घेता मंदिर समितीच्या वतीने बुधवारपासून दोनहजार भाविकांना दर्शनाला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शासनाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घालून दिलेल्या नियम व अटींची अंमलबजावणी करतच दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे राज्य शासनाने उघडण्यास परवानगी दिली आहे. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दररोज एक हजार भाविकांना दर्शनाकरिता सोडण्यात येत होते, आता दर्शनाकरिता दोन हजार भाविकांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून मंदिरे बंद होती. मात्र नित्योपचार दैनंदिन सुरु राहिले. मात्र दिवाळीत पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे भक्तांना दर्शनाकरीता खूली करण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंदिर समितीच्यावतीने श्री विठ्ठल रुक्मिणी गाभरा, श्री विठ्ठल सभामंड, रुक्मिणी सभामंडप, नामदेव पायरी, दर्शन रांग आदीची कर्मचार्‍यांकडून वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे. मंदिरात व नामदेव पायरी ते दर्शन रांगेत स्वच्छतेबरोबरच सॅनिटायझर फवारण्यात येत आहे.

दर्शन रांगेत दोन भाविकांमध्ये सोशल डिस्टन्स राखला जाईल, याची खबरदारी घेण्यात येत आहे, त्याचबरोबर मंदिरात येणार्‍या भाविकांकरीता सॅनिटायझरची सोय, थर्मल स्क्रिनिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचबरोबर शासनाच्या निर्देशानुसार मंदिरात दर्शनाकरीता येणार्‍या भाविक, भक्तांनी मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने नेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजल्यापासून भाविकांना दर्शनाकरीता सोडण्यात येत आहे.
ऑनलाईन बुकींग केलेल्या पास धारकांनाच दर्शनासाठी सोडण्यात येत असल्याने http://www.vitthalrukminimandir.org/home.html
या संकेत स्थळावर बुकिंग भाविकांनी करावे, असे आवाहनहीं मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी केले आहे


– भाविकांसाठी नियमावली

* सकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत 2000 भाविकांना मुख दर्शन घेता येणार
* प्रति तास 200 भाविकांना दर्शनाकरीता सोडणार
* ऑनलाईन दर्शन बुकींग करावे लागणार
* भाविकांनी 24 तास अगोदर ऑनलाईन बुकींग करावे,
बुकींग 8 दिवसापर्यंत करता येणार
* मुख दर्शनाकरीता कासार घाट येथे पास तपासणी करुन दर्शनाला सोडणार
* कोरोनाची लक्षणे आढळणार्‍यांना दर्शन प्रवेश बंद
*मंदिराच्या पुर्व गेट मधून भाविक दर्शनाला आत जातील तर व्हीआयपी गेटमधून बाहेर पडतील.
* दर्शन रांगेत फिजीकल डिस्टन्स (दोन भाविकात 6 फुट अंतर)
ठेवण्यासाठी जागोजागी मार्किंग करण्यात आले आहे.
* अन्नक्षेत्र व प्रसाद व्यवस्था बंद राहिल
* सध्या 65 वर्षावरील नागरिक, 10 वर्षाखालील बालक,
गर्भवती महिला, आजारी व्यक्ती यांनी दर्शनास येणे टाळावे

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #दररोजदोनहजार #भाविकांनामिळणार #विठ्ठलाचेदर्शन #उद्यापासून #अंमलबजावणी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article धुळे-नंदुरबार विधान परिषदेसाठी १ डिसेंबरला मतदान
Next Article विद्यार्थ्यांना झटका, दहावी – बारावी परीक्षा फी माफ होणार नाही, याचिका न्यायालयाने फेटाळली

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?