नवी दिल्ली : दिल्लीसह देशाच्या विविध भागात कोरोना संसर्ग झपाट्याने पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मंगळवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, आगामी काही महिन्यांत कोरोनावरील लस बाजारात येण्याची शक्यता गृहीत धरून लस वितरणावरच्या संदर्भात एक वेगळी बैठक मोदी यांनी बोलावली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जानेवारीच्या शेवटी अथवा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका लसीचा पहिला लॉट भारताला मिळू शकतो. याशिवाय देशातील चार कंपन्याच्या लसीचे क्लिनिकल ट्रायल दुसऱ्या अथवा तिसऱ्या टप्प्यात आहे. थोडक्यात आगामी काळात लसीकरणाचा व्यापक कार्यक्रम देशभरात राबवावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू शकतात.
* …ही समाधानाची बाब
देशातील कोरोना रुग्णांची संख्या 90 लाखांच्या वर गेली आहे. यातील 85 लाखांपेक्षा जास्त लोक उपचाराअंती बरे झाले आहेत, ही समाधानाची बाब आहे. सक्रिय असलेल्या सुमारे साडेचारलाख लोकांवर उपचार सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात कोरोनावरील लस फ्रंटलाइन वर्कर्स उदाहरणार्थ डॉक्टर, नर्स, नगरपालिकेचे कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आदींना दिली जाणार आहे. केंद्र सरकार सीरम इन्स्टिट्यूटला ऑक्सफोर्ड – एस्ट्राजेनेका लसीच्या आपत्कालीन उपयोगासाठी परवानगी देऊ शकते. ब्रिटनमध्ये या लसीला परवानगी मिळताच भारत सरकार मंजुरी देऊ शकते.