ठाणे : एकीकडे वीज बिलाच्या मुद्यावर मनसेनं आक्रमकपणे आंदोलन पुकारले आहे. तर दुसरीकडे ठाण्यामध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरोधात राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यातील मनसेचे पदाधिकारी जमील शेख असं त्यांचं नाव आहे. ठाण्यातील राबोडी परिसरात ही घटना घडली आहे. जमील शेख यांची अज्ञात हल्लेखोराने हत्या केली आहे. जमील शेख यांचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला आहे. आज (सोमवारी) दुपारी ते दुचाकीने घरी जात होते. अशात राबोडी येथील महापालिका शाळेजवळ त्यांचा पाठलाग करत दुचाकीवर दोघे जण आलेत. पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एका अज्ञात इसमाने त्यांच्यावर बंदुकीतून भर रस्त्यात दिवसाढवळ्या गोळी झाडली. गोळी झाडल्याबरोबर जलील हे त्याक्षणी गाडीवरून कोसळले. गंभीर अवस्थेत असलेल्या जमील यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हत्या का करण्यात आली असावी, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मात्र, पोलीस अजूनही हत्येला दुजोरा देत नसून, वैद्यकीय अहवाल आल्यावरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असं पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सांगितले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जमील यांचा मृतदेह शवविच्छेदनाकरता जे जे रुग्णालयाला नेण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. जमील यांचा मृतदेह शवविच्छेदनाकरता जे जे रुग्णालयाला नेण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
दुसरीकडे घटनेचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला असून सीसीटीव्ही च्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, जमीलच्या हत्येनंतर राबोडी भागात तणावाचे वातावरण झाल्याने घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दुसरीकडे घटनेचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला असून सीसीटीव्ही च्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, जमीलच्या हत्येनंतर राबोडी भागात तणावाचे वातावरण झाल्याने घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.