सोलापूर : पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. १ डिसेंबर रोजी मतदान तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. शिक्षक मतदारसंघात ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
पुणे विभागात ७२ हजार ५४५ शिक्षक मतदान करणार आहेत. पदवीधर मतदारसंघात ६२ उमेदवार निवडणूक रिंगणात असून ४.२६ लाख मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये तृतीयपंथी मतदारांचा समावेश असून शिक्षकमध्ये २४ तर पदवीधरमध्ये ३२ उमेदवारांचा समावेश आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शिक्षक मतदारसंघात पुणे जिल्ह्यात ३२ हजार २०१, सातारा ७७११, सांगली ६८१२, कोल्हापूर १२ हजार २३७ तर सोलापूर १३ हजार ५८४ मतदारांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात २३ तर सातारा मतदारसंघात एका तृतीयपंथी मतदाराचा समावेश आहे.
* अशी आहे मतदारसंख्या
पदवीधर मतदारसंघात पुणे जिल्ह्यात ४६ हजार ९५८, सातारा जिल्ह्यात १९ हजार ६७३, सांगली जिल्ह्यात २९ हजार ६६१, कोल्हापूर जिल्ह्यात २६ हजार ८२० तर सोलापूर जिल्ह्यात ११ हजार ७४२ मतदारांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात २३, सातारा व सोलापूर प्रत्येकी एक तर सांगली जिल्ह्यात ३ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.
* पसंतीक्रमावर मतदान…
निवडणूक कार्यालयाकडून मतपत्रिका तयार करण्यात आल्या असून, मतदारांना मतदान पत्रिकेवर पसंती क्रम नोंदवायचा आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकापासून पसंती क्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानुसार मतदारांनी उमेदवारांना पसंती क्रम द्यायचे आहेत.