सोलापूर : पुण्यानंतर सोलापुरात सीएनजी (काॅम्प्रेस्ड नॅच्युरल गॅस) पंप सुरू होत आहेत. त्यासाठी चिंचोळी येथील एमआयडीसीत पंपाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. याशिवाय शहरात एकूण २१ पंप सुरू करण्यात येणार आहेत.
सोलापुरात सीएनजी पंप वाढल्याने पेट्रोल-डिझेलवरील वाहने कमी होण्यास मदत होणार आहे. पर्यायाने बचत आणि पर्यावरणाचा होणारा -हास थांबवण्यास मदत होणार आहे. शहरात चालू होणा-या ११ पंपांपैकी ग्रामीण पोलिस मुख्यालय, अक्कलकोट रोड एमआयडीसी व अक्कलकाेट रोड अशा तीन ठिकाणी तीन पंप उभे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
चिंचोळी एमआयडीसी येथे राष्ट्रीय महामार्गाशेजारी पंपाचे काम युध्दपातळीवर सुुरू आहे. तेथे आवश्यक पाइपलाइन टाकण्यात आली आहे. तेथून मार्च अखेर वाहने व उद्योगांना ‘सीएनजी’ देण्याचे नियोजन आहे. शहरात वरील तीन ठिकाणांशिवाय विजापूर रोड, तुळजापूर रोड, मंगळवेढा रोडसह अन्य परिसरात एकूण २१ पंप सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रस्ताव आले आहेत. शहरात प्रकल्पासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत आमदार प्रणिती शिंदे यांनी बैठक घेतली. जुळे सोलापूर किंवा दोन नंबर बसस्थानक येथे जागा देण्याबाबत चर्चा झाल्याचे वृत्त आहे.
“सर्व तयारी पाहता एप्रिलपर्यंत सीएनजी पंप सुरू करण्याचे आयएमसी कंपनीचे उद्दिष्ट आहे. पुढील आर्थिक वर्षात सोलापुरात सीएनजीची वाहने धावतील, असे नियोजन आहे”
हार्दिक शहा – सीएनजी कंपनी अधिकारी