Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंढरपूर परिसरात लांडग्याचा धुमाकुळ; दोघे जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

पंढरपूर परिसरात लांडग्याचा धुमाकुळ; दोघे जखमी

Surajya Digital
Last updated: 2023/03/27 at 5:52 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

सोलापूर – पंढरपूर तालुका परिसरात लांडग्याने धुमाकूळ घातला असून गेल्या १२ तासात लांडगा चावल्याने महिलेसह दोघेजण जखमी झाले . त्यांना पंढरपूर येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. A wolf rampage in Pandharpur area; Two injured Mango Solapur

 

यापैकी पहिली घटना उजेवाडी (ता. पंढरपूर) येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली . सुमन रावसाहेब क्षीरसागर (वय ५४ ) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे . काल रात्री १० वाजेच्या सुमारास त्या गावातून पायी निघाल्या होत्या . त्यावेळी अचानक लांडग्याने त्यांच्यावर हल्ला करून नाकास चावा घेतल्याने त्या जखमी झाल्या .

तर दुसरी घटना आंबे (ता. पंढरपूर ) येथे रविवारी सकाळच्या सुमारास घडली. दत्तू यशवंत खिल्लारे (वय ६२ रा . आंबे ) असे जखमी झालेल्या शेतमजुराचे नाव आहे. दत्तू खिल्लारे हे सकाळी ८ वाजता सुमारास शेतात काम करीत होते . यावेळी अचानक कोल्ह्याने त्यांच्यावर झडप टाकून चावा घेतला . त्यात त्यांच्या दोन्ही हाताच्या मनगटास जखम झाली.  त्यांना अर्जुन सावंत (मालक ) यांनी सोलापुरात दाखल केले. या दोन्ही घटनांची नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

● पाथरी येथे नदीच्या पात्रात शेतकऱ्याचा मृत्यू

 

सोलापूर – नदीच्या काठावर असलेली पाण्याची मोटर काढत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने प्रल्हाद बाबू सुरवसे (वय ३० रा.पाथरी ता. उ. सोलापूर )हे पाण्यात बुडून मयत झाले.

ही दुर्घटना रविवारी (ता. 26) दुपारच्या सुमारास घडली . प्रल्हाद सुरवसे यांची सीना नदीकाठी शेती आहे . दुपारी एक वाजेच्या सुमारास विद्युत मोटारची पाईप उचलत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते पाण्यात बुडाले . त्यांना पाण्यातून काढून शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ते उपचारापूर्वी मयत झाले .मयत प्रल्हाद सुरवसे हे विवाहित असून त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे .या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली आहे .

 

● लिंबीचिंचोळी येथे अपघात ;वृद्ध महिला ठार

लिंबीचिंचोळी (ता. अक्कलकोट ) येथील गावात अनोळखी वाहनाच्या धडकेने महेबुबबी अमिनोधीन कंडे (वय ६० रा . लिंबेचिंचोली ) ही महिला मयत झाली . आज रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. त्यांना अक्कलकोट येथे प्राथमिक उपचार करून त्वरित सोलापुरातील शासकीय रुग्णाला दाखल केले असता त्या दुपारी मयत झाल्या. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली आहे .

 

 

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #wolf #rampage #Pandharpur #area #Two #injured #anbe #Solapur, #पंढरपूर #परिसर #लांडगा #धुमाकुळ #दोघे #जखमी #सोलापूर #आंबे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अभिनेत्री आकांक्षा दुबेची हत्याच; बेपत्ता गायकावर गुन्हा दाखल
Next Article कार अपघातात एकाच घरातील चार ठार

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?