नवी दिल्ली , 11 एप्रिल (हिं.स.)।१९९३ च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट आणि बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन यांच्या हत्येप्रकरणी अबू सालेमने जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.सध्या तो नाशिक मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे.अबू सालेमने प्रत्यार्पण कराराचा दाखल देत आपली शिक्षा पूर्ण झाल्याचा दावा करत तुरुंगातून सुटका करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
सालेम याने त्याचे वकील फरहाना शाह यांच्यामार्फत न्यायालयात युक्तिवाद केला की, जेव्हा त्याला पोर्तुगालमधून भारतात आणण्यात आले (प्रत्यार्पण करण्यात आले), तेव्हा भारत सरकारने पोर्तुगीज सरकारला आश्वासन दिले होते की त्याला २५ वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा दिली जाणार नाही. त्याचाच दाखला देत सालेमने त्याचा २५ वर्षांच्या कारावासाचा कालावधी १२ ऑक्टोबर २००५ पासून सुरू होऊन ३१ मार्च २०२५ रोजी संपुष्टात आल्याचा दावा उच्च न्यायालयात केला आहे. त्याच्या दाव्याची दखल घेऊन न्यायालयाने त्यावर केंद्र आणि राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
१९९३ च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट आणि बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन यांच्या हत्येप्रकरणी अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तथापि, सालेमने न्यायालयात युक्तिवाद केला की जेव्हा त्याला पोर्तुगालमधून भारतात प्रत्यार्पण करते वेळी झालेल्या करारानुसार त्याची २५ वर्षांची शिक्षा पूर्ण झाली असून त्याची सुटका करण्यात यावी. त्यानुसार २५ वर्षानंतर म्हणजेच २०३० पर्यंत सालेमची सुटका करणे आवश्यक आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.
त्याचवेळी, एखाद्या कैद्याला ज्यावेळी विशिष्ट कालावधीसाठी शिक्षा होते. तेव्हा तो माफीसाठीही पात्र असतो. त्यामुळे, त्याच्या कारावासाच्या कालावधीत कपात होते. चांगल्या वर्तनासाठी आरोपीची शिक्षा कमी करुन त्याची मुदतीपूर्वी सुटका करता येते, त्यानुसार मार्च २०२५ मध्ये सालेमला सोडणे अपेक्षित असल्याचे याचिकेत म्हटले आहे. अबू सालेमच्या याचिकेवरील पुढील सुनावणी २९ एप्रिल रोजी होईल.