Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महाराष्ट्रातील बाजार समित्यांवर महाविकास आघाडीचा मोठा विजय
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

महाराष्ट्रातील बाजार समित्यांवर महाविकास आघाडीचा मोठा विजय

Surajya Digital
Last updated: 2023/04/30 at 1:36 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

मुंबई : भाजपच्या पॅनलने 40 बाजार समित्यांवर विजय मिळवला. शिंदे यांच्या शिवसेनेला 7 बाजार समित्या मिळाल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 38 बाजार समित्यांवर विजय मिळालाय. काँग्रेसचे पॅनल 31 बाजार समित्यांमध्ये विजयी झालंय. तर ठाकरे गट 11 ठिकाणी आणि इतरांच्या वाट्याला 18 बाजार समित्या गेल्या आहेत. महाविकास आघाडीच्या पॅनलला 81 तर 48 बाजार समित्यांवर भाजप आणि शिंदेंची शिवसेना जिंकून आली. Major Vikas Aghadi’s big victory over the Agricultural Produce Market Committees in Maharashtra Congress Nationalist BJP Shiv Sena

 

एकूण निकाल पाहता राज्यातील बाजार समितीमधील मतदारांनी महाविकास आघाडीला कौल दिल्याचे दिसत आहे. १४७ बाजार समिती निकाल हाती आले असता महाविकास आघाडीने बाजी मारली असली तरी भाजपा एक क्रमांकचा पक्ष म्हणून समोर आल्याचा दावा भाजपाने केला आहे. अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल आले असून प्रस्तापित भाजप आणि शिवसेनाच्या सत्तेला सुरुंग लागला आहे. भाजपच नंबर वन असल्याचे ट्विट भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केले आहे.

 

आज निकाल जाहीर झालेल्या बाजार समित्यात #भाजपा नं१
अभिनंदन @Dev_Fadnavis जी @cbawankule जी
पक्षनिहाय जिंकलेल्या जागा-
भाजपा = 201
शिवसेना = 42
राष्ट्रवादी = 156
कॅाग्रेस = 48
उध्दव ठाकरे गट = 22

— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 29, 2023

या निकालात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अनेक बाजार समितीवर आपले वर्चस्व निर्माण केले. राज्यात जरी भाजप सेनेचे सरकार असले तरी मतदारांनी काँग्रेसकडे आपले झुकतमाप दिले आहे. या निकालावरून हेच लक्षात येते की जनता आता काँग्रेच्या पाठीमागे उभी राहू लागली आहे. विदर्भातील भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस उमेदवार निवडून येतो. पुण्यात देखील भाजपाच्या गडात सत्ता हस्तगत केली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

राज्यातील 148 पैकी 75 बाजार समित्यांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले असून यावरून राज्यातील जनता आघाडीच्या बाजूने असल्याचे दिसून येते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. आज राज्यातील बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या भरघोस यशाबद्दल पाटील यांनी जनतेचे आभार मानले आहेत. शिंदे सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या 8-10 महिन्यांत शेतकर्‍यांच्या पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने 1 हजार 200 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. शिवाय बाजार समितीची निवडणूक अधिक गुंतागुंतीची करण्याचा प्रयत्नही शिंदे सरकारने केला. त्यामुळे या विरोधात जनमत किती मोठे आहे हे शेतकरी, व्यापाऱ्यांनी सरकारला दाखवून दिले आहे.

 

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 147 पैकी 94 ठिकाणचे निकाल काल हाती आले होते. काल दुपारी 2 वाजेपर्यंतच्या निकालानुसार, त्यामध्ये मविआ 55 तर भाजप आणि शिवसेनेचे 30 ठिकाणी वर्चस्व दिसून येत होते. राष्ट्रवादीने 27 ठिकाणी तर काँग्रेसने 22 ठिकाणी विजय मिळवला होता. ठाकरे गटाचा 6 तर इतर गटांचे 9 ठिकाणी विजय झाला होता. परत त्यात वाढ होत गेली.

नाशिकमधील पिंपळगाव बसवंत बाजार समिती निवडणुकीची मतमोजणी होती. या मतमोजणीवेळी रिकाऊटींगच्या मुद्द्यावरून माजी आमदार अनिल कदम व अपक्ष उमेदवार यतीन कदम यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. मोठ्या प्रमाणावर पोलीस उपस्थित होते. तरीही हा राडा झाला. आणखी गोंधळ होऊ नये म्हणून अतिरिक्त पोलिसांना बोलवण्यात आले आहे. नंतर सर्व शांत झाले.

 

बीडच्या गेवराई बाजार समितीत 18 जागांपैकी 18 जागेवर राष्ट्रवादी विजय झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा सुपडासाफ झाला आहे. भाजपचे स्थानिक आमदार लक्ष्मण पवार यांना धक्का देत राष्ट्रवादीने एक हाती बाजार समितीवर सत्ता मिळवली आहे. दरम्यान, वडवणीमध्येही 18 पैकी 18 जागा जिंकून राष्ट्रवादीने बाजार समितीवर आपला झेंडा फडकवला.

गेल्या चार वर्षांत ग्रामपंचायतीच्या निवडणुका सोडल्या तर अन्य निवडणुका झालेल्या नाहीत. शिंदे सरकारनं बाजार समित्यांच्या निवडणुका घेतल्या आणि राजकीय क्षेत्रात अमाप उत्साह निर्माण झाला. नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी स्वतःला या निवडणुकीत झोकून दिलं. महाविकास आघाडीचं यश उल्लेखनीय ठरलेलं असताना भाजप आणि शिंदे गट सावध होऊन आता आगामी निवडणुकांसाठी वेगळी रणनीती आखेल, असे संकेत या निवडणुकीनं दिले आहेत.

यंदाच्या बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडी बऱ्यापैकी एकत्र लढली. काही ठिकाणी समजुतीनं एकमेकांविरुद्ध लढण्याचे मनसुबे प्रत्यक्षात उतरवले, असं म्हणण्यास देखील वाव आहे. यावर भाजप-शिंदे गटाला सखोल संशोधन आता करावं लागेल.

 

 

You Might Also Like

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

अपूर्व हिरे बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

TAGGED: #Major #VikasAghadi's #bigvictory #over #Agricultural #Produce #Market #Committees #Maharashtra #Congress #Nationalist #BJP #ShivSena, #महाराष्ट्र #कृषिउत्पन्न #बाजार #समिती #महाविकासआघाडी #मोठा #विजय #भाजपा #राष्ट्रवादी #काँग्रेस
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article निकृष्ट काम : पंढरपूर तुळशी वृंदावनातील काही दिवसातच दुसऱ्यांदा संतांचे मंदिर कोसळले
Next Article न्यायालयीन खटला मागे घेण्यासाठी मागितली खंडणी, कुटुंबाची बदनाम करण्याची धमकी, बार्शीत पाचजणांवर गुन्हा दाखल

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?