Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शाईहल्ला – अजितदादांनी केला निषेध, पण राष्ट्रवादीकडून 51 हजारांचे बक्षीस
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

शाईहल्ला – अजितदादांनी केला निषेध, पण राष्ट्रवादीकडून 51 हजारांचे बक्षीस

Surajya Digital
Last updated: 2022/12/11 at 12:22 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

मुंबई : उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर एका व्यक्तीने शाईफेक हल्ला केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र, ही घटना घडण्याआधीच राष्ट्रवादीतून शाईफेक करणाऱ्याला 51 हजाराचे बक्षीस जाहीर केले होते, या प्रकरणी शाई फेकीस चिथावणी दिल्याप्रकरणी आता राष्ट्रवादीच्या 14 कार्यकर्त्यांवर बारामतीत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, , शाईफेकीनंतरही पैसे देणार असल्याचा व्हिडिओ राष्ट्रवादीने जाहीर केला होता. Shaihalla – Ajitdad protested Ajit Pawar, but police suspended reward of 51 thousand from NCP

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)○ शाईहल्ला – 11 पोलिसांचे निलंबन

 

फुले, आंबेडकर आणि कर्मवीरांबद्दल केलेल्या विधानामुळे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरीत शाईफेक करण्यात आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलीसांनी शाईफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ही शाईफेक केली आहे. मी चळवळीतला माणूस आहे, मी कुणाला घाबरत नाही, असे पाटलांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ही झुंडशाही सहन करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

मंत्री चंद्रकांत पाटलांवर काल एकाने शाही फेकली. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांचे पूर्ण चुकीचे आहे. त्याचा मी निषेधच करतो. पण त्यांनी असे वक्तव्य केले म्हणून त्यांच्यावर शाही फेकणे हेही तितके चुकीचे आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. कोणी कायदा हातात घेऊ नये. मी या घटनेचा निषेध करतो, असे ते म्हणाले आहेत. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या
चेहऱ्यावर शाई फेकणारा मनोज भास्कर गरबडे हा समता सैनिक दलाचा कार्यकर्ता आहे. मनोज सोबत विजय धर्मा ओव्हाळ व धनंजय ईचगज या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चंद्रकांत पाटील चिंचवडमधील एका महोत्सवाचा शुभारंभ करायला आले होते. त्यावेळी कार्यक्रमस्थळी पोहचण्यापूर्वी त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

ही घटना घडण्याआधीच राष्ट्रवादीतून शाईफेक करणाऱ्या व्यक्तीला 51 हजाराचे बक्षीस जाहीर केले होते. या प्रकरणी आता 14 जणांवर बारामतीत गुन्हा दाखल झाला आहे.

 

 

पुण्याचे पालकमंत्री तथा भाजपनेते चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे राष्ट्रवादीचे सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड व कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. जी व्यक्ती चंद्रकांत पाटील यांना काळे फासण्याचे काम करेल. त्याला 51 हजार रूपयांचे बक्षीस दिले जाईल, असे चिथावणीखोर भाषण सोशल मीडियावर व्हायरल केले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर एका युवकाकडून चिथावणीखोर भाषण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या 14 कार्यकर्त्यांवर बारामतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेक हल्ल्यानंतरही हे बक्षीस लवकरच मनोज बरकडेला दिले जाईल हा व्हिडिओ देखील व्हायरल करण्यात आला होता. या संदर्भात बारामती शहर पोलीस स्टेशनला रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत पाटील यांनी शाईफेकीवरून गंभीर आरोप केले आहेत. “हा हल्ला प्रिप्लॅन होता, कोणत्यातरी पत्रकाराने हे कृत्य केले आहे, त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच त्यांनी यावेळी राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.

 

○ शाईहल्ला – 11 पोलिसांचे निलंबन

 

उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर एका व्यक्तीने शाईफेक हल्ला केल्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बंदोबस्त ठेवण्यात हलगर्जी केल्याप्रकरणी 11 पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. यात 8 पोलिस कर्मचारी व 3 पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. चंद्रकांत पाटील काल पिंपरीत मोरया गोसावी या गणपती देवस्थानाच्या संजीवन समाधी सोहळ्याला हजेरी लावणार होते, तेव्हा शाईहल्ला करण्यात आला.

 

 

You Might Also Like

वडोदरा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा १५ वर; बचावकार्य सुरू

मुख्यमंत्री विदर्भाचा, पण काही कामाचा नाही – बच्चू कडू

ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात, 2145 वैज्ञानिक ‘नासा’मधून पडले बाहेर

मुंबईतील ३११ बेकर्‍या हरित इंधनात रूपांतरित करण्याकरिता हायकोर्टाची मुदतवाढ

मुंबई : आकाशवाणी आमदार निवासातील कँटीनचा परवाना रद्द

TAGGED: #Shaihalla #Ajitdada #protested #AjitPawar #police #suspended #reward #51thousand #NCP, #शाईहल्ला #अजितदादा #अजितपवार #निषेध #राष्ट्रवादी #51हजार #बक्षीस #निलंबन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर । दोन मोटारींची समोरासमोर धडक; 2 ठार 4 जखमी
Next Article समृद्धी महामार्गामुळे रोजगाराच्या नव्या संधी’, शाश्वत विकासावर विश्वास – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Latest News

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट
सोलापूर July 10, 2025
सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार
सोलापूर July 10, 2025
crime
सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू
सोलापूर July 10, 2025
पावसाळ्यात वाढला डेंग्यूचा धोका; सहा महिन्यात २८७ जणांना डेंग्यूची लागण
महाराष्ट्र July 10, 2025
सोलापुरातील स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
सोलापूर July 10, 2025
वडोदरा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा १५ वर; बचावकार्य सुरू
Top News July 10, 2025
मुख्यमंत्री विदर्भाचा, पण काही कामाचा नाही – बच्चू कडू
Top News July 10, 2025
ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात, 2145 वैज्ञानिक ‘नासा’मधून पडले बाहेर
Top News July 10, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?