अमरावती, 5 मे (हिं.स.)।
अमरावती ते मुंबई सीएसटीपर्यंत चालविण्यात येणारी अंबा एक्स्प्रेस प्लॅट फ्रॉमच्या कामाचे कारण समोर करून दादरपर्यंत चालविण्यात येत होती. मात्र, आता काम पूर्ण झाल्याने सदरची गाडी पूर्ववत मुंबई सीएसटी स्टेशनपर्यंत चालविण्यात यावी, अशी मागणी माजी खासदार नवनीत राणा यांनी रेल्वेच्या मुख्य व्यवस्थापकाकडे केली आहे.
अमरावती – मुंबई ट्रेन नं. १२१११ ही अंबा एक्सप्रेस गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबईपर्यंत सुरू होती. या गाडीला अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील अनेक विद्यार्थ्यांचे, रुग्णांचे व व्यापारी वर्ग यांची या पसंती होती. परंतु आता ही गाडी फक्त दादर स्टेशनपर्यंत जाते. त्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. अमरावतीवरून मुंबईत जाणारी ही एकमेव गाडी असून प्लॅट फ्रॉमच्या कामामुळे ही गाडी दादर पर्यंत चालविण्यात येत होती. मात्र, आता काम पूर्ण झाल्याची माहिती आहे. त्यामुळे सदरची गाडी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनलपर्यंत चालविण्यात यावी, अशी मागणी भाजपा नेत्या माजी खासदार नवनीत रवी राणा यांनी लेखी पत्राद्वारे रेल्वेचे मुख्य महाव्यवस्थापक मीना व मुंबई डीआरएम व भुसावळ डीआरएम यांना केली आहे.