Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: डोळ्यात राख उडाल्याने अनियंत्रित हार्वेस्टरने दुचाकी चालकास चिरडले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

डोळ्यात राख उडाल्याने अनियंत्रित हार्वेस्टरने दुचाकी चालकास चिरडले

admin
Last updated: 2025/04/09 at 4:55 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

अमरावती, 9 एप्रिल, (हिं.स.)भरधाव वाहनांमधून उडणाऱ्या राखेमुळे महामार्गालगत असलेल्या अनेक गावातील नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय वाहनचालकांच्या डोळ्यात ही केमिकलयुक्त राख शिरत असल्याने अपघाताची शक्यता आहे असे असतांनाही या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने डोळेझाक केल्यामुळे मंगळवारी एका २८ वर्षीय युवकाला आपले प्राण गमवावे लागले. नांदगाव पेठ बस स्टॅन्ड वर मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास वाहनातील राख हार्वेस्टर चालकाच्या डोळ्यात शिरल्यामुळे अनियंत्रित हार्वेस्टरने दुचाकी चालकास चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली.या घटनेत ऋषिकेश सुभाष निंभोरकर (२८) रा. नांदुरा बु.हा युवक जागीच ठार झाला. घटनेनंतर कुटुंबीयांनी शवागृहासमोर आक्रोश करत राखेच्या वाहनांवर कार्यवाही करण्यात यावी ही मागणी रेटून धरत मृतदेह उचलण्यास नकार दिला होता.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,ऋषिकेश निंभोरकर हा बिझिलँड येथील एटीएम वर कार्यरत होता. मंगळवारी दुपारी आपले कर्तव्य बजावून दीड वाजताच्या सुमारास नांदगाव पेठ वरून नांदुरा बु येथे जात असतांना विरुद्ध दिशेने येत असलेल्या हार्वेस्टर चालकाच्या डोळ्यात भरधाव वाहनातील राख उडाल्यामुळे हार्वेस्टर चालकाचे संतुलन बिघडले आणि समोरून येणाऱ्या ऋषिकेशच्या वाहनाला अनियंत्रित हार्वेस्टरने जबर धडक दिली.या अपघातात ऋषिकेश जागीच ठार झाला तर हार्वेस्टर चालकाने तेथून पोबारा केला.

घटनेनंतर नांदगाव पेठ पोलिसांनी हार्वेस्टर चालकाला ताब्यात घेतले आणि ऋषिकेशचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला.घटनेची माहिती कुटुंबियांना मिळताच त्यांनी शवागृहासमोर आक्रोश करत मृतदेह उचलण्यास मनाई केली.ऋषिकेश हा प्रहार जनशक्ती पक्षाचा कार्यकर्ता असल्याने प्रहारचे जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू व प्रहार कार्यकर्ते शवागृहाजवळ पोहचले. छोटू महाराज वसू यांनी कुटुंबीयांचा आक्रोश बघताच पोलीस आयुक्त यांना भेटून रतन इंडिया मधून येणाऱ्या राखेच्या वाहनांवर प्रशासन का कार्यवाही करत नाही असा सवाल उपस्थित केला. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी,उपायुक्त सागर पाटील यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तसेच मृतदेहाची विटंबना होऊ नये यासाठी त्यांनी छोटू महाराज वसू व कुटुंबियांना विश्वासात घेऊन या संदर्भात पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क करून घटनेचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिले.

व त्यानंतर लगेच प्रादेशिक परिवहन विभागाचे मो वा नि. निलेश दहेकर,पल्लवी दौड,स.मो. वा.नि. निलेश जाधव,कांचन जाधव,नांदगाव पेठचे पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे यांनी कुटुंबियांची भेट घेऊन रतन इंडिया ऊर्जा प्रकल्प या कंपनीवर तसेच राखेच्या वाहनांवर योग्य ती कार्यवाही करून मृतक ऋषिकेशला नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लेखी पत्र मृतकाच्या कुटुंबियांना दिले. त्यानंतर कुटुंबीयांनी ऋषिकेशचा मृतदेह ताब्यात घेऊन नांदुरा बु येथील त्याच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख छोटू वसु महाराज, प्रशांत शिरभाते,इमरान शहाल,नितीन शिरभाते, सचिन महल्ले, मयूर निंभोरकर, ऋषिकेश पंचवटी, गजानन भूगूंल,चंदू खेडकर, विशुद्ध जंवजाळ, निलेश पानसे, चंदू उगले व नांदुरा बुद्रुक येथील गावकरी उपस्थित होते.

वृद्ध वडिलांचा आधार होता ऋषिकेश

ऋषिकेशच्या आईचे निधन झाल्यामुळे ऋषिकेश आणि त्याचे वृद्ध वडील हे दोघेच राहत होते. ऋषीकेश हा वडिलांचा एकुलता एक आधार होता. आपली नोकरी सांभाळून आपल्या वडिलांचा सांभाळ तो करत होता.मात्र तरुण मुलाचे अपघाती निधन झाल्यामुळे वृद्ध वडिलांचा आधार हिरावला गेला.

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आ. प्रताप अडसड यांच्या पुढाकाराने विदर्भातील प्रकल्पग्रस्तांची प्रतिक्षा अखेर संपली
Next Article डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महावीर, हनुमान जयंतीसाठी पोलिस सज्ज

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?