Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बुल्ली बाई ॲपच्या मुख्य सूत्रधारास आसाममधून अटक, आता टेलिग्राम चॅनल ब्लॉक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot NewsTechनिकगुन्हेगारी

बुल्ली बाई ॲपच्या मुख्य सूत्रधारास आसाममधून अटक, आता टेलिग्राम चॅनल ब्लॉक

Surajya Digital
Last updated: 2022/01/06 at 11:07 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

नवी दिल्ली : बुल्ली बाई  ॲपच्या (Bully Bai app) मुख्य सूत्रधारास दिल्ली (Delhi police)  पोलिसांनी आसाममधून (assam) अटक (arrested) केली आहे. नीरज बिश्नोई असे आरोपीचे नाव आहे. त्याचे वय 21 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी यापूर्वी मुंबई पोलिसांनी (mumbai police) 3 जणांना अटक केली होती. दरम्यान, बुल्ली बाई ॲपवरुन मुस्लिम महिलांची बदनामी ( Defamation) करण्यात आली होती. सोशल मीडियावरील मुस्लिम महिलांचे फोटो ॲपवर (photo aap) अपलोड करून त्याखाली आक्षेपार्ह पोस्ट नमूद करण्यात आल्या होत्या.

बुल्ली बाईॲपच्या मुख्य ट्विटर ( Main Twitter) खातेदाराला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकातीलइंटेलिजन्स फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स युनिट ( IFSO) ने आसाममधून अटक केली आहे. दुपारी 3:30 वाजता दिल्ली विमानतळावर (airport) या आरोपीला घेऊन टीम (team) पोहोचेल. इनपुट मिळाल्यानंतर दिल्ली पोलिस आसाममध्ये पोहोचले होते, तेथून बुल्ली बाईच्या निर्मात्याला अटक करण्यात आली आहे.

नीरज बिश्नोई असे आरोपीचे नाव आहे. त्याचे वय 21 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी यापूर्वी मुंबई पोलिसांनी तीन जणांना अटक केली होती. यामध्ये श्वेता सिंग, विशाल कुमार आणि मयंक रावत यांना अटक करण्यात आली. श्वेता सिंगला उत्तराखंडमधून अटक करण्यात आली.

मुस्लिम महिला (muslim women) बदनामी प्रकरणी इंटरनेटवर (internet) बुली बाई ॲपवरून सोशल मीडियावरील महिलांचे फोटो अपलोड करून त्याखाली आक्षेपार्ह पोस्ट नमूद करण्यात आल्या होत्या. 31 डिसेंबरला ॲप डेव्हलप करण्यात आलं. त्यानंतर बुली बाई ॲपचे ट्विटर हँडल (handl) तयार करण्यात आले होते. बंगळुरुचा विशाल कुमार झा इंजिनियरिंगच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थीसह तिघांना अटक करण्यात आली आहे.

प्रत्यक्षात असा कोणताही ‘लिलाव’ किंवा ‘विक्री’ झाली नव्हती परंतु या ॲपच्या माध्यातून महिलांना अपमानित  करणे आणि त्यांना धमकावण्याचा हेतू या ॲपचा असल्याचे समोर आले होते. यातील अनेक महिला सोशल मीडियावर (social media) खूप सक्रिय आहेत.

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

* आता टेलिग्राम चॅनलला ब्लॉक

आता सरकारने एका हिंदू महिलांचे अश्लील फोटो शेअर करणाऱ्या एका टेलिग्राम चॅनलला (Telegram Channel) ब्लॉक (block) केले आहे, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे.

बुली बाई ॲपचा वाद सोशल मीडियावर पसरल्यानंतर आणि लोकांनी मुस्लिम महिलांना लक्ष्य (target) केल्याबद्दल देशातील उजव्या विचारसरणीच्या गटांवर टीका सुरू केल्यानंतर, सोशल मीडिया वर हिंदू महिलांना (hindu women) टार्गेट करणारे ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल हायलाइट (highlights) करण्यास सुरुवात केली. बुल्लीबाई प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी केलेल्या झटपट अटकेनंतर लोकांनी हिंदू महिलांचा ऑनलाइन छळ (Online harassment)  रोखण्यासाठी कोणतीही पावले का उचलली जात नाहीत, असा सवाल (question) विचारला जात आहे.

महिलांचे अश्लील फोटो ( Pornographic photos) आणि द्वेषपूर्ण मेसेज ( Hateful message) पसरवल्याबद्दल ‘हिंदू रंडीया’ नावाच्या चॅनलसंबंधी राग व्यक्त केला गेल्यानंतर आता हे टेलिग्राम चॅनल ब्लॉक करण्यात आले आहे. दरम्यान चॅनेल ब्लॉक केले असून, भारत सरकार (india Government) कारवाईसाठी राज्यांच्या पोलिस अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहे, असे ट्विट आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले. हे टेलिग्राम चॅनल कोणी तयार केले आणि पोलिसांनी काय कारवाई केली याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती ( Official information)  मिळालेली नाही.

* गीतकार जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया

बुली बाई  ॲपच्या वादग्रस्त प्रकरणात मुंबई पोलिसांनी 18 वर्षीय तरुणीला अटक केली आहे. अटकेनंतर काही वेळातच ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर ( Senior lyricist Javed Akhtar) यांनी सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून आपले मत (opnian) व्यक्त केले आहे. त्यांनी लोकांना मुलीला माफ (sorry) आवाहन केले आहे.

ट्विटर हँडलवर नेटिझन्सना दया दाखवून मुलीला माफ करण्यास सांगितले. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलयं की, “जर “बुल्ली बाई” अ‍ॅप 18 वर्षीय मुलीद्वारा बनविण्यात आले असून जिने नुकतेच कर्करोग (cancer) आणि कोरोनामुळे  (corona) आपले पालक गमावले आहेत. तर मला वाटते की, महिलांनी तिला भेटले पाहिजे आणि वडिलधाऱ्यांप्रमाणे तिला समजून घेतले पाहिजे. मात्र जे ही तिने केलं ते अगदी चुकीचं केलं. तिच्याप्रतील दया दाखवा आणि तिला क्षमा करा.”

You Might Also Like

मोर्शी एसडीओंच्या खाजगी कारमधून पिस्तूल चोरी; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

दिल्लीमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची पार्किंग वादातून हत्या

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

TAGGED: #BullyBai #app's #main #facilitator #arrested #Assam #telegram #channel #block, #बुल्लीबाई #ॲप #मुख्यसूत्रधार #आसाम #अटक #टेलिग्राम #चॅनल #ब्लॉक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रश्मी ठाकरेंबाबत आक्षेपार्ह ट्विट, भाजप नेत्याला अटक
Next Article राज्यात पुढील चार दिवस गारपिट, अवकाळी पावसाचा इशारा

Latest News

सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
देश - विदेश August 18, 2025
‘द बंगाल फाइल्स’वरून विवेक अग्निहोत्रींविरुद्ध नवा एफआयआर
देश - विदेश August 18, 2025
त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण
महाराष्ट्र August 18, 2025
सोलापुरात डीजेमुक्त गणेश मंडळांना विशेष बक्षीस
सोलापूर August 18, 2025
शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष; महाडीबीटी पोर्टलमुळे लाभार्थी वंचित
सोलापूर August 18, 2025
सोलापुरात जिल्हा परिषदेची दोन एकरांची फाईल गायब
सोलापूर August 18, 2025
बिहारचा औंठा-सिमारिया ६ पदरी पूल पूर्ण; २२ ऑगस्टला पंतप्रधान करतील उद्घाटन
देश - विदेश August 18, 2025
वंदे भारतला जोडणार चार डबे; ३१२ प्रवाशांना अतिरिक्त सुविधा
सोलापूर August 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?