Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Attempted murder अकलूजमध्ये जुन्या भांडणाच्या वादातून कुऱ्हाडीने वार करून खुनाचा प्रयत्न
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

Attempted murder अकलूजमध्ये जुन्या भांडणाच्या वादातून कुऱ्हाडीने वार करून खुनाचा प्रयत्न

Surajya Digital
Last updated: 2022/05/19 at 6:34 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

अकलूज : जुन्या भांडणाचा राग डोक्यात धरून जिवे मारण्याच्या उद्देशाने कुऱ्हाडीने वार केल्याची घटना अकलूज पोलिस स्टेशन समोरच घडल्याने एकच खळबळ उडाली. यात अकलूज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.  यात खुनाचा प्रयत्न म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. Attempted murder in Akluj over an old feud

वार करून आरोपी पोलिस स्टेशनमध्येच घुसल्याने त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. वार झालेल्याला जखमी अवस्थेत दवाखान्यात दाखल करण्यात आले. याबाबत अकलूज पोलिस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार , अकलूज येथील फिर्यादी निखिल नागनाथ शिरसट (वय 26 रा . व्यंकटनगर- अकलूज ता . माळशिरस) याचे व आरोपी हिरा खंडागळे (रा . अकलूज) यांच्यात जुने भांडण होते. त्या भांडणातून हिरा खंडागळे याने निखील शिरसट याच्यावर केस केली होती. या दोघांमध्ये केस माघे घेण्यासंदर्भात बाचाबाची झाली होती.

मंगळवारी ( दि. 17 मे) निखिल शिरसट रात्री साडेदहाच्या सुमारास त्याच्या दुसऱ्या मित्राचे भांडण सोडवण्यासाठी अकलूज पोलिस स्टेशनला आला होता.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

दरम्यान त्याचवेळी निखिल शिरसट याला मारण्याच्या उद्देशाने दोन तासाहून अधिक काळ दबा धरून बसलेल्या हिरा खंडागळे याने मिळालेल्या संधीचा फायदा घेत अकलूज पोलिस स्टेशनच्या गेट समोर ‘ तू लई मस्तीला आलाय का माझा नाद करू नको मी केस मागे घेत नाही ‘ वैगरे म्हणत तूला खलास करतो, असे म्हणत निखील शिरसट याच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला.

तो वार पाठीमागे मानेवर बसला. कुऱ्हाडीचा वार जबरी बसल्याने रक्ताच्या थारोळ्यात भिजलेल्या निखिल शिरसट याने लागलीच घाबरून आरडा – ओरडा केला . त्यामुळे दुसरा वार करण्यासाठी हिरा खंडागळे पाठीमागे पळत आला असतानाच तेथील शिरसटचे सहकारी व पोलीस यांच्या मदतीने खंडागळे यास कुऱ्हाडीसह ताब्यात घेतले. यावेळी शिरसट यास मार लागल्याने तात्काळ राणे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.

 

गुन्ह्यातील अरोपी हत्यारासह जेरबंद करून जखमी फिर्यादीच्या जबाबावरून गुन्ह्यातील संशयित ईतर अरोपी व खूनाचा कट रचणारे अरोपी यांचा तपास पोलीस निरीक्षक अरूण सूगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोसई जगताप करीत आहेत. आरोपी विरोधात पोलीस ठाणे अकलूज येथे गुरनं 357/2022 भादवि 307 व 120 ब व सहकलम 143 ते 147 ते 149 प्रमाणे 504 , 506 कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

You Might Also Like

सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद

सोलापूर-मुंबई विमानसेवा महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न

सोलापूर एमआयडीसीत 56 बेकायदा बांधकामे

सोलापुरात इतर आजारांसाठी दाखल रुग्णांपैकी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

उजनी धरणात मुसळधार पावसामुळे अवघ्या ३ दिवसांत 12 टीएमसी पाणीसाठा;

TAGGED: #Attempted #murder #Akluj #old #feud #solapur #crime, #अकलूज #जुन्या #भांडण #वाद #कुऱ्हाडी #वार #खुन #प्रयत्न
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Navjot Singh Sidhu पार्किंगवरून भांडण : नवज्योत सिंग सिद्धू यांना जेल, सुप्रीम कोर्टाचा निकाल
Next Article Teacher salary एक तारखेला होणार शिक्षकाचा पगार : एक बटन दाबले अन शिक्षकांचा 94 कोटी पगार झाला जमा

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?