अमरावती : शिवसेनेचे तिवसा शहर प्रमुख अमोल पाटील यांची हत्या करण्यात आली आहे. तिवस्यातील आशिर्वाद बारसमोर रात्री 10.30 वाजता 5 जणांनी पाटील यांची हत्या केली. अमोल पाटील मित्रासोबत बारमध्ये आले होते. यावेळी 5 जणांनी डोळ्यात मिरचीपूड टाकून पाटील यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. रात्री उशिरा पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली तर 1 जण फरार आहे. अवैध धंद्यातून ही हत्या झाल्याची चर्चा आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1409058963061051392?s=19
अमोल पाटील याच्यावर यापूर्वी दोन हत्या केल्याचा आरोप होता. त्याला दीड महिन्यांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोन वर्षासाठी जिल्ह्याबाहेर तडीपार होण्याचा आदेशही काढला होता. अवैध उद्योगातून ही हत्या झाल्याची चर्चा आहे.
अमोल पाटील मित्रासोबत शनिवारी रात्री आशीर्वाद बारमध्ये गेला होता. मात्र बार बंद झाल्याने दोघंही बारसमोर बसले होते. यावेळी दोन ते तीन जणांनी अमोल पाटीलच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली. त्यानंतर त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याला जागीच ठार केले.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1409035260751278085?s=19
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
https://twitter.com/SurajyaDigital/status/1409113130827845644?s=19
घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस निरीक्षक रिता उईके यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी जमा झाली होती, मात्र अद्यापही आरोपींचा शोध लागला नाही. राष्ट्रीय महामार्गावर वर्दळीच्या ठिकाणी राजकीय पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याने जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1409096057665904644?s=19
याआधी, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख आणि शिवसेना संस्थापक उमेशभाई शेट्टी यांचे पुत्र राहुल उमेश शेट्टी यांची पुण्यात निर्घृण हत्या झाली होती. राहत्या घरासमोर जयचंद चौकातच डोक्यावर आणि मानेवर धारदार शस्त्रांनी वार करत त्यांना जवळून तीन गोळ्या मारण्यात आल्या होत्या.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1409084109943566340?s=19