Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

admin
Last updated: 2025/05/03 at 2:00 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

* नामांकन सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै

अधिकृत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलद्वारे ऑनलाइन नामांकन सादर करावे

नवी दिल्ली, ३ मे (हिं.स.) : देशभरातील अद्वितीय कामगिरी करणाऱ्या मुलांना दरवर्षी राष्ट्रपतींच्या हस्ते प्रतिष्ठेच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित केले जाते. वर्ष 2025 मधील पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन भारत सरकारने केले आहे. नामांकन सादर करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2025 आहे. सर्व नामांकने https://awards.gov.in या अधिकृत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलद्वारे ऑनलाइन सादर करावीत.

वयवर्षे 5 ते 18 वयोगटातील मुले या पुरस्कारासाठी (31 जुलै 2025 पर्यंत) अर्ज करू शकतात. कोणतीही व्यक्ती किंवा संस्था प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अपवादात्मक कामगिरी असलेल्या मुलांना नामांकित करू शकते. तसेच मुले स्वतःचे नामांकन करून देखील अर्ज करू शकतात.

अर्ज करण्यासाठी, अर्जदारांना प्रथम स्वतःचे नाव, आडनाव, जन्मतारीख, अर्जदाराचा प्रकार (व्यक्ती/संस्था), मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, आधार क्रमांक इत्यादी तपशील आणि ‘कॅप्चा’ पडताळणी देऊन पोर्टलवर नोंदणी किंवा लॉग इन करावे लागेल. नोंदणी केल्यानंतर, चालू नामांकन विभागांतर्गत “प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025” हा रकाना निवडावा आणि “नामांकन करा/आता अर्ज करा” वर क्लिक करावे. त्यानंतर अर्जदारांनी संबंधित पुरस्कार श्रेणी निवडावी आणि नामांकन स्वतःसाठी आहे की इतरांसाठी आहे हे सूचित करावे.

नामांकनाच्या अर्जात नामनिर्देशित व्यक्तीची माहिती, त्यांनी केलेली कामगिरी आणि त्या कामगिरीचा प्रभाव यांचे वर्णन करणारे एक संक्षिप्त निवेदन (जास्तीत जास्त 500 शब्द), इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत (पीडीएफ फॉरमॅट, 10 अटॅचमेंट्स) आणि अलीकडील छायाचित्र (jpg/jpeg/png फॉरमॅटमध्ये) आवश्यक आहे. अर्जाचे मसुदे जतन केले जाऊ शकतात आणि अंतिम क्षणी सादर करण्यापूर्वी त्यात बदल केले जाऊ शकतात. एकदा पुनरावलोकन आणि सादर केल्यानंतर, अर्जाची डाउनलोड करण्यायोग्य प्रत संदर्भासाठी उपलब्ध असेल.

शौर्य, समाजसेवा, पर्यावरण, क्रीडा, कला आणि संस्कृती, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांत असामान्य कामगिरी करणाऱ्या 18 वर्षांखालील (31 जुलै 2025 पर्यंत) मुलांचा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) देवून गौरव केला जातो.

भारतातील युवावर्गाने विविध क्षेत्रांत केलेल्या कामगिरीचा सन्मान करुन त्यांना प्रोत्साहन देणे आणि देशातल्या इतर युवकांना वास्तविक जीवनातील आदर्श दाखवून प्रेरणा देणे तसेच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम वातावरण निर्माण करणे हे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार पुरस्कारांचे उद्दिष्ट आहे.

अधिक माहितीसाठी आणि नामांकनासाठी, कृपया https://awards.gov.in ला भेट द्या.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उत्सवामुळे महाबळेश्वरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणार – उपमुख्यमंत्री शिंदे
Next Article फेलोशिपच्या प्रतिक्षेतील 480 विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?