Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राष्ट्रवादीचे पुणे माजी शहराध्यक्ष दीपक मानकरांच्या मुलासह व्याह्यावर गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे पुणे माजी शहराध्यक्ष दीपक मानकरांच्या मुलासह व्याह्यावर गुन्हा दाखल

admin
Last updated: 2025/05/30 at 4:47 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

पुणे , 30 मे (हिं.स.)।राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्याविरोधात दोन आठवड्यांपूर्वी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बनावट दस्त तयार करून तो खरा असल्याचे भासवून सादर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.त्यानंतर आता त्यांचा मुलगा करण मानकर आणि व्याही सुखेन सुरेशचंद्र शहा यांच्यावरही समर्थ पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महिलांवर बलात्कार करणारा आरोपी शंतनू कुकडे यांच्याकडून मानकर यांच्या मुलाने 50 लाख रुपये घेतल्याचा समोर आलं आहे. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात शंतनू कुकडे, करण मानकर यांच्यासह आणखी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. करणे हे कर्ज शंतनू कुकडे यांच्याकडून घेतलेल्या पाच कोटी रुपयांच्या कर्जासाठीच हा स्टॅम्प व्यवहार करण्यात आला जो बनवत होता.

हे प्रकरण तेव्हा उघडकीस आलं ज्यावेळी शंतनू कुकडे याच्यावर अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर आणखी एका सामूहिक बलात्कारात देखील त्याचा सहभाग होता. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरू असताना कुकडे आणि रोनक जैन याच्या बँक खात्यावरून लाखोंचा व्यवहार झाल्याचा समोर आलं. तरी चौकशी केली असता दीपक मानकर, करण मानकर आणि सुखे शहा यांच्या बँक खात्यावर हा लाखो रुपयांचा व्यवहार झाला होता.दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, बलात्कारातील आरोपी शंतनू कुकडेसोबतचे असलेले आर्थिक व्यवहार लपवल्याप्रकरणी आणि पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल केल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

त्यामुळे पोलिसांनी गुरुवारी (दि.२९) दाखल झालेल्या गुन्ह्यात करण मानकर याची चौकशी केली असता त्याने जबाबात, आपण डोणजे येथे २०२४ मध्ये दुग्ध व्यवसाय सुरू करणार होतो. तेव्हा शंतनू कुकडे हा पाच कोटी रुपये कर्ज स्वरूपात मदत देणार होता. हे कर्ज ४० वर्षांसाठी देण्यात येणार होते. त्यासाठी करारनामा दोघांच्या संमतीने केला असून, त्यातील ५० लाख कुकडेने वर्ग केल्याचे सांगितले होते. मात्र, तपासात बनावट दस्त बनवून ते खरे असल्याचे भासविल्याचे उघड झाले.

दुसरीकडे, करण मानकरचा सासरा सुखेन शहा याने जबाबात मुलगा सिद्धांत हा मुळशी येथे १० एकरवर रिसॉर्ट तयार करणार होता. त्या रिसॉर्टमध्ये गुंतवणूक म्हणून शंतनू कुकडेने ५ कोटी २२ लाख आणि रौनक जैन याने १ कोटी ३० लाख रुपये पाठवल्याचे सांगितले होते. त्यासाठी त्यांनी स्टँप पेपरवर केलेला करारनामा सादर केला होता. मात्र, तपासणीत त्यांनीही बनावट दस्त बनविल्याचे आढळले. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिस आयुक्त अमितेश कुमार स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आयपीएल २०२५ : आरसीबी विरुद्धच्या पराभवानंतर पंजाब किंग्ज आता क्वालिफायर-2 मध्ये खेळणार
Next Article संशोधनासाठी विद्यार्थ्यांमध्ये कुतुहल जागृत होणे गरजेचे – कुलगुरु माधुरी कानिटकर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?