Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: केंद्राकडून शिष्यवृत्तीचे ५७१ कोटी मिळणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

केंद्राकडून शिष्यवृत्तीचे ५७१ कोटी मिळणार

Surajya Digital
Last updated: 2021/01/03 at 11:53 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : राज्याच्या समाजकल्याण आयुक्त कार्यालयाने केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारला केंद्र सरकारच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे ६० टक्के हिश्श्याचे ५७१ कोटी रुपये २०२०-२१ या चालू आर्थिक वर्षात मिळणार आहेत. केंद्राच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या सचिवांनी नुकतेच राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाला याबाबत कळविले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

महाराष्ट्रासह देशात विविध राज्यांमध्ये केंद्र सरकार पुरस्कृत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीबाबतचा प्रश्न २०१७-१८ पासून प्रलंबित होता. केंद्र सरकारने भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती धोरणांमध्ये बदल केल्याने त्याचा फटका महाराष्ट्रासह विविध राज्यांना बसत होता.

* मंत्री धनंजय मुंडेंनी केला पाठपुरावा
केंद्र पुरस्कृत योजना असूनसुद्धा केंद्राच्या हिश्श्याचा निधी राज्यांना मिळत नव्हता. त्यामुळे राज्य सरकारला या योजनेसाठी निधी स्वत: उपलब्ध करून द्यावा लागत होता.

परिणामी, राज्याच्या तिजोरीतून सुमारे एक हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागत होता. हा प्रश्न सुटण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर केंद्र शासनाने दखल घेऊन केंद्राचा हिस्सा उपलब्ध करून देणार असल्याचे आदेश निर्गमित केले.

* विद्यार्थ्यांना आवाहन

जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी २०२०-२१ या चालू शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व महाविद्यालयांनी आणि अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी सरकारच्या महाडीबीटी या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज तत्काळ सादर करावेत. तसेच विहित वेळेत लाभार्थ्याने आपले बँक खाते आधार संलग्नीकृत करून घ्यावे, असे आवाहन समाजकल्याण आयुक्तालयाने केले आहे.

You Might Also Like

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे

शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री

महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी

TAGGED: #केंद्राकडून #शिष्यवृत्तीचे #५७१कोटी #मिळणार #केंद्राच्या #हिश्श्याचा #निधी #राज्यांना
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नवी मुंबई विमानतळ नामांतरावरुन मनसे – शिवसेना समोरासमोर येणार
Next Article मराठमोळ्या ऋतुजा रावणला ‘मिस इंडिया’चे उपविजेतेपद

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?