Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंढरपूर बाजार समिती बिनविरोध होण्याची शक्यता धूसर, 18 जागांसाठी 117 अर्ज
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

पंढरपूर बाजार समिती बिनविरोध होण्याची शक्यता धूसर, 18 जागांसाठी 117 अर्ज

Surajya Digital
Last updated: 2023/04/04 at 11:26 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

• अभिजित पाटील यांच्या भूमिकेमुळे निवडणुकीत रंगत

पंढरपूर – पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये १८ जागेसाठी विक्रमी ११७ अर्ज दाखल झाले आहेत. यामुळे यंदा बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. अभिजित पाटील यांच्या भूमिकेमुळे निवडणुकीत रंगत आली आहे. Chances of Pandharpur Bazar Samiti going unopposed are bleak, 117 applications for 18 seats Patil Paricharak Bhalke Awatade Kale

सोमवारी (ता. ३ ) उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी विविध पक्ष, गट, संघटना यांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे सहायक निबंधक कार्यालयात एकच गर्दी झाली होती. सत्ताधारी परिचारक गटासह विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील गट, आमदार आवताडे गट, विठ्ठल परिवार, बळीराजा शेतकरी संघटनासह विविध शेतकर्‍यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. कमीत कमी दहा गुंठे शेती असणारा शेतकरी उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो, असा नवीन नियम करण्यात आल्याने उमेदवारांची संख्या वाढली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

परिचारक गटाकडून हरिष गायकवाड, दिलीप चव्हाण, राजू गावडे, महादेव बागल, जयसिंग भुसनर, तानाजी पवार, संतोष भिंगारे, हरिभाऊ ङ्गुगारे, महादेव लवटे, नागनाथ मोहिते, शिवदास ताड, अभिजीत कवडे, पंडीत शेंबडे, वसंत चंदनशिवे, सचिन कुचेकर, यासिन बागवान, सोमनाथ डोंबे, श्रीमंत डांगे, शारदा अरूण नागटिळक व संजिवनी बंडु पवार आदींनी उमेदवारी दाखल केली आहे. दरम्यान व्यापारी मतदार संघातून केवळ डोंबे व बागवान यांचेच अर्ज दाखल झाले आहेत.

तर मनसेचे नेते दिलीप धोत्रे, विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे आदी नेत्यांनी विठ्ठल परिवाराअंतर्गत एकत्र येत ७० हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

 

विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी स्वतंत्रपणे सतरा उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.अभिजित पाटील यांच्या भूमिकेमुळे निवडणुकीत रंगत आली आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सदर निवडणुकीमध्ये लवचिक धोरण स्वीकारणार असल्याचे सांगत विरोधकांशी हातमिळवणी करणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे विठ्ठल परिवार व परिचारक यांच्यामध्ये युती होणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र अभिजीत पाटील यांची ‘एकला चलो रे ‘ भूमिका असल्याचे चित्र आहे.

You Might Also Like

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे

स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री

आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी नेत्यांनी घ्यावी – एकनाथ शिंदे

हंबरडा फोडायची भाषा केली तरी साथ मिळणार नाही – एकनाथ शिंदे

TAGGED: #Chances #Pandharpur #BazarSamiti #going #unopposed #bleak #applications #seats #Patil #Paricharak #Bhalke #Awatade #Kale, #पंढरपूर #बाजारसमिती #बिनविरोध #शक्यता #धूसर #जागा #अर्ज #परिचारक #भालके #पाटील #काळे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शटडाऊन | शेळगी व विडी घरकुल भागातील पाणीपुरवठा होणार विस्कळीत
Next Article टप्पा अनुदानाचे काम टप्प्यात येताच माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा केला करेक्ट कार्यक्रम

Latest News

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष : लष्करी चौक्या आणि टँक उद्ध्वस्त
देश - विदेश October 15, 2025
नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 15, 2025
सोनम वांगचुक प्रकरण : २९ ऑक्टोबरला पुढील सुनावणी
देश - विदेश October 15, 2025
अमेरिकेतील भारतीय वंशाचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ एशले टेलिसला अटक
देश - विदेश October 15, 2025
श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी 25 लाखाचा निधी
महाराष्ट्र October 15, 2025
बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?