पुणे, 5 मे (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा एकूण निकाल .91.88 टक्के लागला आहे.दरवर्षी प्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारलीय आहे. मुलांचा निकाल 89.51 टक्के तर मुलींचा निकाल 9458 टक्के लागला आहे.राज्यात निकालात कोकण विभाग पहिल्या क्रमांकावर असून लातूर विभाग शेवटच्या क्रमांकावर आहे.
राज्य मंडळाच्या 9 विभागीय मंडळातर्फ राज्यातील सुमारे 15 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. मागील वर्षी 93.37 टक्के निकाल लागला होता. यंदा 91.88 टक्के निकाल लागला असल्याने निकालात 1.49 टक्के घट झाली आहे. राज्यात यंदा पुणे विभागाचा निकाल 91.32 टक्के असून नागपूरचा निकाल 90.52 टक्के आहे. तर छत्रपती संभाजीनगर 92.24 टक्के, मुंबई विभाग 92.93 टक्के, कोल्हापूर 93.64 टक्के, अमरावती 91.43 टक्के, नाशिक 91.31 टक्के, लातूर 89.46 टक्के आणि कोकण विभागाचा निकाल राज्यात सर्वाधिक म्हणजे 96.74 टक्के इतका आहे.