Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: उळे गावाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक : १ ठार, दोघे जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

उळे गावाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक : १ ठार, दोघे जखमी

Surajya Digital
Last updated: 2022/03/17 at 11:17 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : भरधाव दुचाकींची जोरदार धडक लागून झालेल्या अपघातात १ जणांचा मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाले. ही दुर्घटना सोलापूर – तुळजापूर हायवेवर कासेगाव शिवारातील सद्गुरु पेट्रोल पंपाजवळ बुधवारी (ता.१६) सायंकाळच्या सुमारास घडली.

या जखमींना रूग्णालयात पोहोचविण्यासाठी स्थानिक प्रदीप मगर यांनी प्रयत्न केले. केवळ १५ मिनिटात जखमींना पोहोच केल्याबद्दल रुग्णवाहिका चालक सागर लोंढे यांचे मगर यांनी आभार मानले.

सोलापूर – तुळजापूर महामार्गावरील सद्गुरु पेट्रोल पंपाजवळ सायंकाळी दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक लागून चौघे जण गंभीर जखमी झाले. अपघातस्थळी बघ्यांची गर्दी वाढली, मात्र जखमींना मदत करण्यासाठी कोणी पुढे धजावले नाही. त्याचवेळी तुळजापूर तालुका शिवसेना उपप्रमुख प्रदीप मगर यांनी ॲम्बुलन्स बोलावून तातडीने जखमींना रुग्णालयात पाठविले.

सुधीर राऊत, दिनेश भोसले ( दोघे रा. सिंदफळ, तालुका तुळजापूर), समाधान विश्वनाथ दंडवते आणि प्रमोद कोंडीबा मिटकरी (दोघे रा. हिंगणगाव, सांगली) अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविले. रुग्णवाहिका चालक सागर लोंढे यांनी दुर्घटनास्थळापासून केवळ पंधरा मिनिटात सर्व जखमींना सिव्हिल हॉस्पिटलपर्यंत नेले. जखमींपैकी सुधीर भारत राऊत (रा. सिंदफळ) यांचा हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. Two two-wheelers collided head-on near Ule village: 1 killed, 2 injured

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

या अपघातात एमएच २५/एएफ ४२७० आणि एमएच १३/बीएच ७१०१ या मोटारसायकली समोरासमोर धडकल्याने दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बघ्यांच्या गर्दीतून प्रत्यक्ष जखमींजवळ जायला कोणी तयार नव्हते, त्यावेळी प्रदीप मगर यांनी जखमींना ताबडतोब ॲम्बुलन्स बोलावून सिव्हिल हॉस्पिटलकडे पाठवले. त्यांच्या समयसुचकतेमुळे तिघांचे प्राण वाचले.

● बैलगाडीची धडक, जखमी दुचाकी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू
सोलापूर – बैलगाडीच्या धडकेने जखमी झालेले अमोल दादाराव राजगुरू (वय ३२ रा. घारोळे,वैराग ,ता.बार्शी) हे सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेताना बुधवारी (ता. १६) मयत झाले.     सायंकाळच्या सुमारास ते आपल्या दुचाकीवरून वैराग ते तडवळ असा प्रवास करीत होते. समोरून बैलगाडी धडकल्याने ते जखमी झाले होते. त्यांना बार्शी येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात सोमवारी दाखल करण्यात आले होते. अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

You Might Also Like

सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद

सोलापूर-मुंबई विमानसेवा महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न

सोलापूर एमआयडीसीत 56 बेकायदा बांधकामे

सोलापुरात इतर आजारांसाठी दाखल रुग्णांपैकी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

उजनी धरणात मुसळधार पावसामुळे अवघ्या ३ दिवसांत 12 टीएमसी पाणीसाठा;

TAGGED: #उळे #गाव #दुचाकी #धडक #ठार #जखमी #सोलापूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article व्यवस्थापन परिषदेच्या पाच सदस्यांनी केले कर्तव्याचे उल्लंघन
Next Article बार्शीचे जवान रामेश्वर काकडे शहीद, आज सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?