Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरातील बार्शीत चक्क ‘कोरोना देवी’चे मंदिर; कोरोना देवीला खुश करण्यासाठी कोंबडे – बक-यांचे बळी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापुरातील बार्शीत चक्क ‘कोरोना देवी’चे मंदिर; कोरोना देवीला खुश करण्यासाठी कोंबडे – बक-यांचे बळी

Surajya Digital
Last updated: 2020/09/01 at 6:03 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर / बार्शी : राज्यातील मंदिरं खुली करण्यासाठी आंदोलन सुरु असताना, सोलापुरात कोरोना देवीचे मंदिर उघडण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका ठिकाणी काही व्यक्तींकडून ‘कोरोना’ नावाच्या देवीची स्थापना करण्यात आली आहे. स्थापना केलेल्या देवीला खुश ठेवण्यासाठी कोंबडे, बकरे आदींचा बळी देवून तिचे पूजन केले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील पारधी वस्ती सध्या याच कोरोना देवीच्या मंदिरामुळे चर्चेत आले आहे. कोरोना महामारीमुळे कोरोना देवीची स्थापना आणि पूजन केल्याचे तेथील नागरिकांनी सांगीतले असून देवीच्या सेवेने आमचे वाईट होणार नसल्याची त्यांची श्रध्दा आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणा रात्रंदिवस काम करत आहे. इकडे मात्र पारधी वस्तीत कोरोनाचा बिमोड करण्यासाठी कोरोना देवीची स्थापना करुन त्याचे पूजन केल्याने त्यांचा अशिक्षितपणा उघड झाला आहे. विशेष म्हणजे या कोरोना देवीचा प्रभाव ही लोकांना जाणवू लागल्याचं इथल्या वस्तीतल्या लोकांचं म्हणणं आहे.

कहर म्हणून लोक त्यात कशाची जोड देतील याचा नेम नाही. कोरोनादेवीसाठी कोंबडे कापले जातात, देवासाठी हा प्रकार होत असल्याचं सांगितलं जातं आहे. कोरोना संसर्गापासून बचाव होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मास्कचा वापर करत असताना इकडे मात्र भलतंच सुरु आहे. आमचा रोग जावा, सुख मिळावे म्हणून कोरोनादेवीला इथे जागा दिली आहे. त्यामुळे देवाच्या कृपेमुळे तोंडाला कपडे लावायची गरज नसल्याचं सांगितलं जातं आहे.

वस्तीतल्या महिलांना ही अकल्पीत देवी मोठा आधार वाटू लागली आहे. आम्ही कोरोनादेवीची स्थापन केली. आम्ही तिला मरेपर्यंत माणणार, आखाडाच्या महिन्यापासून हे सुरु आहे. यापुढेही आयुष्यभर सांभाळणार, देवीपासून आमचे चांगले होईल, अशी आशा या महिलांनी व्यक्त केली आहे.

* भावनेचा बाजार असल्याचं अनिसचं मत

अंधश्रदा विषयक कितीही कायदे काढले तरी समाजातील अंधश्रद्धा अद्यापही हद्दपार होत नाही. आजही भावनेचा बाजार मांडून अंधश्रद्धांना खतपाणी घालण्याचे काम सुरुच आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील सोलापूर रस्त्यावरील पारधी वस्ती येथे एका ठिकाणी टाईल्स फरशीचा छोटासा कट्टा करुन, दुसऱ्या एका ठिकाणी लहान गोलसर दगड ठेवून, आणखी एका ठिकाणी अनेक फोटोंसह देव्हारा असलेल्या देवघरात लिंबू ठेवून अज्ञातांकडून कोरोना देवीची स्थापना करण्यात आली आहे.
यावर अनिसने हे सर्व भावनेचा बाजार असल्याचे म्हटले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गोष्टीचे समूळ उच्चाटन करण्याची मागणी केली आहे. माणसाचे मन भावनिकतेने विचार करते, त्यातूनच अंधश्रध्देच्या आहारी गेल्याचे दिसून येत असल्याचं अनिसने म्हंटलं आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #कोरोनादेवी #सोलापूर #बार्शीशहर #पारधीवस्ती #अनिस #कोंबडेबकरे #बळी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मंदिर उघडण्याची मागणी : औरंगाबादमध्ये तणावाची परिस्थिती, शिवसेना आणि एमआयएम आमने – सामने
Next Article राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे निधन; चार दिवसांपूर्वी जिवंत समाधीची अफवा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?