Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: क्रूरतेचा कळस, नशीब परदेशात घडले, हृदय शिजवून कुटुंबीयांना जेवायला वाढले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारी

क्रूरतेचा कळस, नशीब परदेशात घडले, हृदय शिजवून कुटुंबीयांना जेवायला वाढले

Surajya Digital
Last updated: 2021/02/25 at 10:45 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

वॉशिंग्टन : अमेरिकेतील ओकलाहोमा येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ज्या क्रूरतेने आरोपीने हत्या केली, ते ऐकून सर्वच हादरून गेले. खुद्द पोलीसही चक्रावून गेले. या प्रकरणात पोलिसांनी लॉरेन्स पॉल अँडरसन याला अटक केली असून, एकाच कुटुंबातील तिघांची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

ओक्लाहोमा सिटी न्यूज 4 टीव्ही आणि ओक्लाहोमन वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, लॉरेंस पॉल एंडरसन नावाच्या आरोपीने सर्वांत आधी आपल्या शेजारणीची चाकूने भोसकून हत्या केली. त्यानंतर तिच्या शरीराच्या भागांना कापून बाजूला केलं.

एंडरसन या आरोपीची पार्श्वभूमी गुन्हेगारीचीच राहिली आहे. तो या गुन्ह्याच्या आधीच एक आठवडा तुरुंगातून सुटून आला होता. ओक्लाहोमाचे गव्हर्नर केविन स्टिट यांनी वेळेआधीच त्याची सुटका केली होती. त्याला 2017 मध्ये ड्रग्जमधील आरोपामध्ये 20 वर्षांचा तुरुंगवास सुनावला गेला होता. मीडियात आलेल्या रिपोर्ट्सनुसार, मंगळवारी एंडरसनने कोर्टामध्ये हत्येचा आरोप कबूल केला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

ओकलाहोमा स्टेट ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या माहितीनुसार, अँडरसनने शेजारच्या कुटुंबातील तिघांची हत्या केली. त्यात ४१ वर्षीय एंड्रिया लीन ब्लेंकशिप हिचाही खून केला आहे. तिच्या हत्येनंतर आरोपीने चाकूने तिचे हृदय बाहेर काढले. त्यानंतर बटाट्यासोबत ते शिजवले आणि पीडितेच्या कुटुंबातील लोकांना जेवणासोबत वाढले. आरोपी अँडरसन हा जानेवारीतच तुरुंगातून सुटून बाहेर आला होता. तो तुरुंगातून सुटल्यानंतर इतके भयानक कृत्य करील, याचा विचारही कुणी केला नसेल.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अँडरसनने हत्येमागचे कारण सांगितले आहे. आपल्या कुटुंबीयांना राक्षसांपासून वाचवण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याची कबुली दिली. अँडरसनने एंड्रियासह ६७ वर्षीय लियोन पेइ आणि त्यांची चार वर्षांची नात काइओस हिचीही हत्या केली. या हल्ल्यात लियोन पेइची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. हे कुटुंब आरोपीच्या शेजारीच राहत होते.

आरोपी अँडरसन याला कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी तो रडू लागला. मला जामीन नको, असे त्याने कोर्टात सांगितले. अँडरसनच्या वकिलांनी सांगितले की, आरोपीच्या मानसिक तपासणी केली जाईल. हा खटला लढवण्याच्या स्थितीत आहे की नाही याचा तपास केला जाईल. अँडरसनला २०१७ मध्ये ड्रग्ज प्रकरणात दोषी ठरवून २० वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र, या वर्षी जानेवारीत त्याची सुटका करण्यात आली होती.

You Might Also Like

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #culmination #cruelty #luckhappened #abroad #theart #grew #feedthefamily, #क्रूरतेचा #कळस #नशीब #परदेशातघडले #हृदय #शिजवून #कुटुंबीयांना #जेवायलावाढले
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पत्नी कोणती वस्तू नाही, तिच्याकडून सर्व कामांची अपेक्षा करु शकत नाही – कोर्ट
Next Article मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?