Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दुचाकीस ट्रॉलीची धडक; मामासोबत गावी जाण्यास निघालेल्या भाचीचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

दुचाकीस ट्रॉलीची धडक; मामासोबत गावी जाण्यास निघालेल्या भाचीचा मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2022/11/17 at 5:33 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● कांदा घेऊन निघालेला पीकअप पलटी, तिघांचा मृत्यू

बार्शी : बार्शी येथील झाडबुके महाविद्यालयात शिकत असलेली मुलगी कॉलेज संपवून मामासोबत दुचाकीवरून गावी जात असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकटर ट्रॉलीची धडक बसली. यात भाचीचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. Collision with two-wheeled trolley; Onion pick-up overturns death of niece who was about to go to village with uncle, three killed in Karjat

 

सानिका नारायण दिवटे (वय 17 रा .सिरसाव ता.परांडा) असे मृत मुलीचे नाव आहे. खाली पडल्याने तिच्या डोकीस जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि 15 ) दुपारी 12 च्या सुमारास बार्शी तालुक्यातील कांदलगाव रोडवरील करडे वस्ती नजीक असलेल्या नागोबा मंदिराजवळ घडली. याबाबत तालुका पोलीसात अकस्मात मयताची नोंद झाली आहे.

 

मयत मुलगी ही येथील झाडबुके महाविद्यायत आर्टस् विभागात 11 वीत शिकत होती. या दिवशी कॉलेज संपवून सिरसावगावी मामासोबत दुचाकीवर बसून जात होती. पाठीमागून येणाऱ्या ट्रक्टर पुढे जात असताना तिच्या डोकीस ट्रॉलीची जबर धडक बसली. दुचाकीसह खाली कोसळताच तिच्या डोकीस जबर मार लागून गंभीर जखमी होऊन जागीच बेशुद्ध पडली. तिचा मामाही धडकेने कडेला असलेल्या शेतात पडला होता. तातडीने तिला एका वाहनातून येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारास दाखल केले. पण उपचारापूर्वीच मयत झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याने घोषीत केले.

अपघाताची माहिती पोलिसांना समजताच दवाखान्यात जाऊन अकस्मात मयत नोंद केली. रात्री शवविच्छेदन होताच तिचा मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात दिला. तर पोलिसानी घटनास्थळी जाऊन
पहाणी करताना चालक वाहन सोडून पसार झाल्याने पोलिसांनी ट्रॅक्टर ताब्यात घेतला आहे. पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

● कांदा घेऊन निघालेला पीकअप पलटी, तिघांचा मृत्यू

मोहोळ : कोळेगाव (ता. मोहोळ ) पाटीजवळ कांदा घेवून निघालेला पीकअप जीप पलटी होवून झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले आहेत. हे तिघे कर्जतमधील होते. 

कोरेगाव ( ता. कर्जत ) येथून (एम एच १६ ए वाय २६७४ ) या क्रमांकाचा पीकअप जीप सोलापूर येथील मार्केट यार्ड येथे कांदा घेवून निघाला होता. तो मोहोळ सोलापूर दरम्यान मोहोळ पासून आठ कि मी अंतरावर असलेल्या कोळेगाव पाटीजवळ उताराला लागला असता मागील टायर फुटल्याने तो पलटी झाला.

 

 

हा अपघात काल बुधवारी (ता. 16) रात्री दीड वाजणेच्या सुमारास झाला. या अपघात पिरमलसिंग धोंडीसिग परदेशी (वय ५५) व दत्तात्रय भानूदास शेळके (वय ५५ रा. कोरेगाव ता. कर्जत) हे दोघे जण जागेवरच ठार झाले. या पीकअप जिप चा चालक नितीन धुळाजी बदंगे (वय ३६ रा. बदंगवाडी ता कर्जत) हा गंभीर जखमी झाला होता. त्यास तातडीने उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.

 

परंतु उपचारादरम्यान पहाटे त्याचाही मृत्यू झाला. या घटनेचा तपास मोहोळ पोलिस करत आहेत.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #Collision #two-wheeled #trolley #Onion #pick-up #overturns #death #niece #village #uncle #three #killed #Karjat, #दुचाकी #ट्रॉली #धडक #मामा #गावी #भाची #मृत्यू #कांदा #पीकअप #पलटी #तीनठार #कर्जत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर । दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून फार्मासिस्ट तरुणाने केली आत्महत्या
Next Article सोलापूर । पी. शिवशंकर यांच्या बदलीने कामगार संघटनेत आनंद, आणले फटाके

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?