जळगाव, 12 एप्रिल (हिं.स.) जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याच्या धमकीचा मेल आला आहे. अज्ञात व्यक्तीने मुख्यमंत्री कार्यालयाला जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना जीवे मारण्या संदर्भातला मेल पाठवल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हाधिकारी यांना जीवे मारू असा मेल मधील आशय असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री कार्यालयाला हा मेल पाठवला गेला असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यासंदर्भात पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे. पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घटनेला दुजोरा दिला आहे.
दुसरीकडे जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची डंपरद्वारे हत्या करण्यात येईल. त्याच बरोबर जिल्ह्यात दंगली घडविण्यात येतील. जळगावचे वरिष्ठ पोलीस अधिकारी भ्रष्ट असल्याने त्यांना निलंबित करण्यात यावे, अशा स्वरूपाचा धमकीचा ईमेल मुख्यमंत्री कार्यालयाला देखील प्राप्त झाल्याची माहिती समोर येत आहे.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, मुख्यमंत्री कार्यालयाला प्राप्त झालेला हा ई-मेल मुख्यमंत्री कार्यालयाकडून जळगावचे जिल्हाधिकारी आणि पोलिसांना पाठविण्यात आला असून पोलीस या ई-मेलच्या संदर्भात सखोल तपास करत आहेत. तर या घटनेसंदर्भात पोलीस अधीक्षकांना तपास करण्याबाबत सूचना देण्यात येतील आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल.
जिल्हाधिकारी यांच्यासह विविध पोलिस अधिकाऱ्यांना जीवे मारण्याबाबत अगोदरही तीन ते चार वेळेस धमकीचे मेल हे पोलिसांना मिळाले आहेत. या मेलमधील भाषा पाहता अशा ई मेलकडे फारसे गांभीर्याने घ्यावे, असे दिसत नाही. मात्र तरीही या सगळ्या घटनेबाबत सायबर सेलच्या माध्यमातून गुन्हा दाखल करत मेल करण्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.
—————