Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: फुले चित्रपट टॅक्स फ्री करून लाडक्या बहिणींना मोफत दाखवण्याची मागणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

फुले चित्रपट टॅक्स फ्री करून लाडक्या बहिणींना मोफत दाखवण्याची मागणी

admin
Last updated: 2025/05/01 at 6:28 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अहिल्यानगर दि. 1 मे (हिं.स.) :- देशात सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडविणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित फुले हा चित्रपट स्त्रियांना नवी प्रेरणा देणारा ठरणार आहे. हा चित्रपट सरकारने टॅक्स फ्री करावा व देशभरातील लाडक्या बहिणीं ना मोफत दाखवावा, अशी मागणी पीपल्स हेल्पलाईनचे प्रकाश थोरात यांनी केली आहे.

प्रकाश थोरात म्हणाले की, जगातील दुःख स्त्री- पुरुष विषमतेतून निर्माण झाले आहे.ही विषमता दूर करण्या साठी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य झोकून दिले. दीडशे वर्षांपूर्वीच त्यांनी स्त्री व दलितांच्या शिक्षणासाठी संघर्ष करून सामाजिक न्यायाचा पाया घातला.महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी देशात पहिल्यांदा मुलींसाठी शाळा सुरू केल्या आणि वाचनालयां चे जाळे उभारले. 1854 मध्ये त्यांनी देशातील साक्षरता अभियानाची सुरुवात केली. विधवांच्या संगोपनासाठी 1863 मध्ये स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. त्याचबरोबर सत्यशोधक समाजाची स्थापना करून हुंड्याशिवाय विवाहाची प्रथा रूढ केली.

अस्पृश्‍यांसाठी आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला करून जातिभेदाच्या विरोधात पहिले पाऊल उचलले. त्यांनी बालविवाह विरोधा त आवाज उठवला आणि विधवांच्या पुनर्विवाहाला प्रतिष्ठा दिली.स्वतःच्या मुलाचा आंतरजातीय विवाह घडवून आणत जाती निर्मूलनाच्या चळवळीला स्वतःच्या घरातून सुरुवात केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची प्रेरणा आजच्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वा ची आहे. त्यांच्या कार्याची गाथा फुले या चित्रपटात मांडली असून, तो प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, असे प्रकाश थोरात यांनी सांगितले. या चित्रपटातून आजच्या महिलांना प्रेरणा व आत्मविश्‍वास वाढवणारी दिशा मिळेल आणि समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला नवे बळ मिळेल, असेही ते म्हणाले.

You Might Also Like

सोलापुरात शरद पवारांना बसणार जोरदार धक्का ?

गेले त्यांचा विचार करू नका, पुन्हा कामाला लागा, शरद पवार

दिग्विजय सिंह यांच्या भावाची काँग्रेसमधून गच्छंती

जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची मागणी शरद पवारांनी केली मान्य

राहुल गांधींना रोज खोटं बोलायची सवय लागली – फडणवीस

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article काँग्रेस कमिटी मध्ये जनगणनेच्या निर्णयाचे पेढे वाटून स्वागत
Next Article शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा – दादाजी भुसे

Latest News

नाशिकमधील उबाठा गटाच्या चार माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
महाराष्ट्र June 17, 2025
भारतीयांनी तेहरान सोडून सुरक्षित ठिकाणी जावे
महाराष्ट्र June 17, 2025
कर्नाटक हायकोर्टाची आरसीबी, केएससीएला नोटीस
देश - विदेश June 17, 2025
आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण
महाराष्ट्र June 17, 2025
शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करण्याची मागणी
महाराष्ट्र June 17, 2025
कोलकाता : एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
देश - विदेश June 17, 2025
राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती
सोलापूर June 17, 2025
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा
सोलापूर June 17, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?