Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शासकीय महापूजेसाठी उपमुख्यमंत्र्यांना मंदिर समितीकडून निमंत्रण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

शासकीय महापूजेसाठी उपमुख्यमंत्र्यांना मंदिर समितीकडून निमंत्रण

Surajya Digital
Last updated: 2022/10/21 at 12:25 PM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

 

Contents
》 कार्तिक यात्रा : रस्त्यावरील खड्डे बुजविणे व स्वच्छतेला प्राधान्यपंढरपूर : – कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. 4 नाव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असून यात्रेचा कालावधी 26 ऑक्टोंबर ते 8 नोव्हेंबर 2022 आहे. परतीच्या सतत पडणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पंढरपूर शहरातील तसेच शहराकडे येणाऱ्या रस्त्यांवर खड्डे पडले असल्याने प्राधान्याने खड्डे बुजवून स्वच्छता करावी. यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांची कोणतेही गैरसोय होणार नाही याची दक्षता सर्व संबधित विभागाने घ्यावी अशा, सूचना प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या.स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

पंढरपूर :- कार्तिकी शुध्द एकादशी निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न होणार आहे. Devendra Fadnavis Karthik Vari invitation from temple committee to Deputy Chief Minister for official mahapuja

 

शुक्रवारी (4 नोव्हेंबर) कार्तिकी शुध्द एकादशी असून, आज गुरुवारी (दि. 20 ) मंत्रालय, मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शासकीय महापूजेसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने निमंत्रण देण्यात आले.

 

मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह .भ .प गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते वारकरी पटका, वीणा व श्रीची मूर्ती भेट देऊन निमंत्रण देण्यात आले. यावेळी आमदार बालाजी किणीकर, मंदिर समितीचे सदस्य श्रीमती शकुंतला नडगिरे, ह भ प ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲड माधवी निगडे, ह. भ. प शिवाजीराव मोरे, ह .भ. प प्रकाश जवजाळ, आचार्य तुषार भोसले, अप्पर जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजीव जाधव, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.

 

● फडणवीसांच्या नावे आणखी एक रेकॉर्ड!

 

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावावर एक आगळे वेगळे रेकॉर्ड झाले आहे. येत्या 4 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असून या दिवशी पंढरपुरातील विठ्ठल पूजेचा मान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाला आहे. आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशी अशा दोन्ही पूजेचा मान मिळवणारे फडणवीस हे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती आहे. पंढरपूर मंदिर समितीने त्यांना पूजेचे निमंत्रण सुद्धा दिले आहे.

 

 

》 कार्तिक यात्रा : रस्त्यावरील खड्डे बुजविणे व स्वच्छतेला प्राधान्य

 

पंढरपूर : – कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. 4 नाव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असून यात्रेचा कालावधी 26 ऑक्टोंबर ते 8 नोव्हेंबर 2022 आहे. परतीच्या सतत पडणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पंढरपूर शहरातील तसेच शहराकडे येणाऱ्या रस्त्यांवर खड्डे पडले असल्याने प्राधान्याने खड्डे बुजवून स्वच्छता करावी. यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांची कोणतेही गैरसोय होणार नाही याची दक्षता सर्व संबधित विभागाने घ्यावी अशा, सूचना प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या.

 

 

कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांच्या सोयी-सुविधासाठी प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबत शासकीय विश्रामगृह पंढरपूर बैठक घेण्यात आली. बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी, पोलीस निरिक्षक धनंजय जाधव, मिलींद पाटील, अरुण फुगे, मंदीर समितीचे लेखाधिकारी अनिल पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप केचे, पशुसंवर्धनचे सहा.आयुक्त डॉ.भिंगारे तसेच संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना प्रांताधिकारी म्हणाले, यात्रा कालावधीत नगरपालिकेने स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा मुबलक पाणी पुरवठा करावा, परतीच्या पावसामुळे शहरात विविध ठिकाणी पाणी साठल्यामुळे डासांची उत्पती वाढण्याची शक्यता असल्याने तात्काळ फवारणी करुन घ्यावी. चंद्रभागा वाळवंटात पुरेशा प्रकाश राहिल याबाबत नियोजन करावे,धोकादायक इमारतींवर ठळक सूचना फलक लावावेत. अनाधिकृत फलक काढावेत.मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. मंदीर समितीने व नगरपालिकेने प्रदक्षिणा मार्ग, नदीपात्रात आवश्यक ठिकाणी बॅरकेंटींग करावे व अग्निशामक यंत्रणा कार्यरत ठेवावी.

 

आरोग्य विभागाने तज्ञ डॉक्टरांसह वैद्यकीय पथकाची नेमणूक करावी. तसेच फिरते वैद्यकीय पथक, ऑक्सिजन, रक्तपुरवठा तसेच मुबलक औषधसाठा उपलब्ध राहील याबाबत नियोजन करावे.कार्तिकी यात्रा कालावधीत मंदीर समितीने जादाचे पत्राशेड उभारावेत, दर्शन रांगेत ठिकठिकाणी सूचना फलक लावावेत. दर्शनरांगेत व दर्शन मंडपात भाविकांना स्वच्छ पिण्याच्या व्यवस्था करावी. मंदिरात तसेच मंदिराभेवती करण्यात येणाऱ्या विद्युत रोषणाईचे फायर ऑडीट करुन घ्यावे.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

तालुक्यात गोवंशीय जनावरांमध्ये लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पशुवैद्यकीय विभागाने शहरातील मोकाट जनावरांचेही लसीकरण करुन घ्यावे. यासाठी नगरपालिकेने सर्व मोकाट जनावरे एकाच ठिकाणी येतील याबाबत नियोजन करावे. अन्न. व औषध प्रशासनाने अशा सूचनाही प्रांताधिकारी गुरव यांनी दिल्या. यात्रा कालावधीत वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी तसेच भाविकांना सुरक्षेबाबत कोणतेही अडचण येऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक नियोजन केले असल्याचे उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.

 

पंढरपूर शहरातील पार्कीग ठिकाणची लेव्हलिंग करुन झाडे-झुडपे काढावेत तसेच प्रकाश व्यवस्था करावी.मंदीर व मंदीर परिसरात फिरत्या विक्रेत्यांमुळे मोठ्या प्रमाणात भाविकांना त्रास होतो यासाठी जादा हॉकर्स पथकाची नेमणूक करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी बोअरवेल, हातपंपाची पाणी तपासणी करण्यात येत आहे. पावसामुळे शहरात पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरु असून, स्वच्छतेसाठी जादा हंगामी स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. 65 एकरमध्ये भाविकांच्या सुविधेसाठी पाणी, वीज, स्वच्छता आदी सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच शहरात वेळोवेळी जंतनाशक फवारणी करण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी सांगितले.

 

You Might Also Like

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

उजनी धरणातून ३ महिन्यात सोडले २०० टीएमसी पाणी

TAGGED: #DevendraFadnavis #KarthikVari #invitation #templecommittee #DeputyChiefMinister #official #mahapuja, #पंढरपूर #शासकीय #महापूजा #उपमुख्यमंत्री #मंदिरसमिती #निमंत्रण #कार्तिकयात्रा #देवेंद्रफडणवीस
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर शहराचा वीस वर्षासाठीचा विकास आराखडा दोन वर्षात होणार तयार
Next Article Diwali gift नियमित कर्ज फेडणा-या शेतक-यास राज्य सरकारकडून दिवाळी गिफ्ट

Latest News

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे
राजकारण October 11, 2025
मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट
महाराष्ट्र October 11, 2025
इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले
देश - विदेश October 11, 2025
बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी
महाराष्ट्र October 11, 2025
अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात
महाराष्ट्र October 11, 2025
लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ
महाराष्ट्र October 11, 2025
आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता
खेळ October 11, 2025
स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री
राजकारण October 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?