खास प्रतिनिधी
तुळजापूर सोलापूर : राज्यात खळबळ उडवून देणार्या सर्वात मोठ्या तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात ड्रग्जच्या तस्कारीचा मार्ग राजधानी मुंबई टू तुळजापूर व्हाया सोलापूर असा झाल्याची माहिती तपासातून सकृतदर्शनी आली होती. या प्रकरणात सोलापूरचे नाव आले होते. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ड्रग्ज प्रकरणात तस्कारीच्या वाहतूक मार्गासाठी केवळ ‘सोलापूर’चा नामोल्लेख सुरुवातीला झाला होता. तेव्हाच, याप्रकरणाशी सोलापूरचे कनेक्शन निश्चितपणे असणार, असा अंदाज होता. तो तंतोतंत खरा ठरला. या प्रकरणी धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल झालेल्या 10 हजार पानांच्या दोषारोप पत्रात सोलापूरचा आवर्जून उल्लेख आहे. विशेषत्वे, आरोपींचे जबाब आणि सीडीआरच्या माहितीतून सोलापूच्या नावाचा स्फोट झाला आहे. दोषारोप पत्रात अनेक गंभीर मुद्यांचा उल्लेख आहे. या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढणार आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे हादवून टाकणार्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात सोलापूरचे नाव आल्यानंतर या प्रकरणाशी इथले कोण ठकसेन तस्करीच्या विश्वात होते, यासंबंधीची उत्सुकता आता शिगेला पोचणार आहे. शिवाय ड्रग्ज तस्करी प्रकरणात सोलापुरातील ‘त्या’ ड्रग्ज बहाद्दरांची एंट्री झाली कशी? तस्करांच्या साखळीत सोलापुरातील संबंधित तरुण सहभागी कसे झाले? याची माहिती मिळणे खूप रंजक ठरणार आहे.
तामलवाडी पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोप पत्रात अनेक गंभीर मुद्यांचा उल्लेख आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणात एकूण 35 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. 14 आरोपींना अटक करण्यात आली. 21 आरोपी फरार आहेत. तर, 80 जणांना नोटीस बजावण्यात आली आहे.या प्रकरणात आरोपींची संख्या वाढल्याचीदेखील माहिती दोषारोप पत्राच्या अनुषंगाने, पुढे आली आहे.
दोन महिन्यांत दोषारोपपत्र; अत्यंत गंभीर भानगडी समोर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या तुळजापुरात ड्रग्ज तस्करीचे मोठे रॅकट उघडकीस आले आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. गुन्हा घडल्यापासून दोन महिन्यात म्हणजे 60 व्या दिवशी तामलवाडी पोलिसांनी धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. 10 हजार पानांचे हे दोषारोपपत्र आहे. दोषारोपपत्रात अनेक गंभीर मुद्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
दोषारोपपत्रात मुंबई, सोलापूर, पुणे ड्रग्ज कनेक्शन असल्याचा उल्लेख दोषारोपपत्र दाखल केले आहे. आरोपीचे जबाब, घटनास्थळ, पंचनामा, सिडीआर या सह इतर बाबींचा दोषारोप पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. मुंबई, सोलापूर, पुणे येथील ड्रग्ज कनेक्शन असल्याचा ही उल्लेख या दोषारोपत्रात करण्यात आला आहे.
धाराशिव न्यायालयात सुनावणीला येणार गती तपास अधिकारी गोकूळ ठाकूर यांनी दोषारोपपत्र दाखल केले. दोषारोपपत्र सादर केल्याने सुनावणीला वेग येणार आहे. याप्रकरणात एकूण 35 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. 14 आरोपींना अटक करण्यात आली. 21 आरोपी फरार आहेत. तर, 80 जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील पुजारी
अन् राजकीय कार्यकर्ते यांच्या सहभागाने प्रकरणाला वेगळे वळण
तुळाजापुर तालुक्यातील तामलवाडी इथे 15 फेब्रुवारी रोजी ड्रग्जचा मोठा साठा जप्त केला होता. तेव्हापासून ड्रग्ज तस्करीबाबत अनेक खुलासे समोर आलेत. याप्रकरणात पोलिसांनी ड्रग्ज पेडलर्सना अटक केली. त्यानंतर या ड्रग्ज विक्रिचे धागेदोरे मुंबईपर्यंत पोहचे. मुंबईतून ड्रग्ज तस्करीप्रकरणी संगीता गोळे हिला अटक करण्यात आली. विशेष पथकांची नेमणूक करत पोलिसांकडून तपास केला जातोय. यात तुळजाभवानी मंदिरातील पुजार्यांच्या सहभाग असल्याने खळबळ उडाली.
10 हजार पानांच्या दोषारोपपत्रात नेमकं दडलंय तरी काय?
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात 35 आरोपी असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. लाखो भाविकांच्या तुळजापुरात ड्रग तस्करी मध्ये पुजारीच पेडलर असल्याचं समोर आलो होतं. त्यानंतर अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणात राजकीय कनेक्शन समोर आल्यानंतरआतापर्यंत 14 आरोपींना अटक करण्यात आली असून 21 आरोपी फरार आहेत.ड्रग्ज तस्करीत कोणाचे रोल काय दोषआरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. बँक ट्रांजेक्शन, आरोपींचा एकमेकांशी संपर्क कसा झाला दोषआरोपपत्रात नमूद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दोषारोपपत्रात आरोपीची क्रमवारी निश्चित नाही, प्रकरणात कोणाचा रोल काय हे ठरवण्यात आल्याची माहिती आहे. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी संगीता गोळे आणि इतर आरोपींचा संपर्क कसा झाला, आरोपींची साखळी कशी तयार झाली याबाबत दोषआरोपपत्रात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यात आरोपीचे जबाब, सीडीआरची माहिती तसेच मुंबई, सोलापूर, पुणे येथील तस्करी प्रकरणात संबंध असल्याची दोषारोपपत्रात माहिती आहे.