Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अखेर एकनाथ शिंदेंची माघार ! नवीन जाहिरात देऊन  मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे हसे करून घेतले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

अखेर एकनाथ शिंदेंची माघार ! नवीन जाहिरात देऊन  मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे हसे करून घेतले

Surajya Digital
Last updated: 2023/06/14 at 3:19 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
● अजित पवारांचा खोचक टोलास्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

● अजित पवारांचा खोचक टोला

मुंबई : मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदेंना पसंती असलेल्या सर्व्हेसह फक्त नरेंद्र मोदी, शिंदेचा फोटो असलेली जाहीरात वृत्तपत्रातून झळकल्याने फडणवीसांना शिंदे गटाकडून डावलले जात असल्याच्या चर्चा रंगल्या.  Finally, Eknath Shinde’s retreat! Chief Minister Ajit Pawar made himself laugh by giving a new announcement अशातच आज देण्यात आलेल्या जाहीरातीत शिंदे, फडणवीस, मोदी, अमित शाह, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचे फोटो असल्याचे दिसत आहे. यामुळे शिंदेंनी माघार घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.

 

इतकी वर्षे राजकारणात आहे, पण पहिल्यांदा अशी जाहिरात बघितली. ही जाहिरात देऊन मुख्यमंत्र्यांनी स्वतः चे हसे करून घेतले आहे. शिवसेनेने स्वतःच ठरवून सर्वेक्षण केले. पण हे सर्वेक्षण कोणी केले? कोणी सांगितले की कोणाला किती टक्के पसंती आहे? अशा प्रकारच्या सर्व्हेची जाहिरात करण्याचा एक विश्वविक्रमच राज्याच्या प्रमुखांनी केला आहे, असा खोचक टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारच्या जाहिरातीवरून लगावला.

अजित पवार म्हणाले की, लोकांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा कौल दिला आहे हे ऐकून खूपच आनंद वाटला. कारण, चांद्यापासून बांद्यापर्यंत लोकांना शिंदे पुढे व्हावेत असे वाटायला लागले आहे. मग इतकाच जर तुम्हाला लोकांचा पाठिंबा आहे तर तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का घेत नाही ? असा सवाल विचारत त्यांनी एकप्रकारे मुख्यमंत्र्यांना आव्हानच दिले आहे.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

 

येत्या पंधरा – वीस दिवसांनंतर निवडणुका घेतल्या नसल्यामुळे त्याला एक वर्ष पूर्ण होईल. वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते विविध पदांसाठी इच्छुक आहेत, तरीसुद्धा तुम्ही निवडणुका घेत नाहीत. उन्हाळा सुरू असतानाही तुम्ही निवडणूक घेतली नाही. त्यांना निवडणुका घेण्याची भीती वाटते. एकीकडे जाहिरातीवर मात्र एवढ्या प्रमाणावर खर्च करायचा, याला अर्थ नाही, अशीही टीका अजित पवारांनी यावेळी केली.

‘देशात मोदी अन् राज्यात शिंदे’ या जाहिरातीनंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले. भाजपच्या काही नेत्यांनी यावरुन नाराजी व्यक्त केली तर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून या जाहिरातीवरुन सारवासारव करण्यात येत आहे. या जाहिरातीशी शिवसेनाचा काहीही संबंध नाही, जाहिरात देणारा हितचिंतक अज्ञात आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.

आजच्या जाहिरातीचा शिवसेना पक्षाचा काहीही संबध नाही. हितचिंतकाने ही जाहिरात दिलेली असावी. आम्ही मित्रपक्ष आहोत, पहिल्या दुसऱ्या पदासाठी आमची रस्सीखेच नाही. हिंदुत्वाच्या मुद्यावर 30 वर्षापूर्वी केलेली युती आम्ही पुढे नेत आहोत. जाहिरात देणारा हितचिंतक अज्ञात आहे, अशी प्रतिक्रिया शंभुराज देसाई यांची वादग्रस्त जाहिरातीवर दिली. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे आमच्या मनात आहेत म्हणून फोटोत नसले तरी चुकीचा अर्थ काढू नये, असेही ते म्हणाले.

You Might Also Like

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात

उबाठाच्या दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातून मार्गस्थ

एकनाथ शिंदे यांनी साधला स्थानिक काश्मीरी नागरिकांशी संवाद

TAGGED: #Finally #EknathShinde's #retreat #ChiefMinister #AjitPawar #himself #laugh #giving #new #announcement #advertise, #अखेर #एकनाथशिंदे #माघार #नवीन #जाहिरात   #मुख्यमंत्री #स्वतःचे #हसे #खोचकटोला #अजितपवार #शिवसेना
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article श्री सिद्धेश्वर साखर कारखान्यात मोठा पोलिस बंदोबस्त
Next Article बायको वरातीत नाचल्याने नवऱ्याने केली पट्ट्याने मारहाण; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

Latest News

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र June 22, 2025
सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले
सोलापूर June 22, 2025
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात
महाराष्ट्र June 22, 2025
संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान
सोलापूर June 22, 2025
“ट्रम्पची नोबेलसाठी शिफारस यासाठीच केली होती का…?”
देश - विदेश June 22, 2025
कर्नाटक : सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांना कायद्याने आळा घालणार
देश - विदेश June 22, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?