Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद; मात्र आरेमध्ये बांधकाम करावेच लागेल, लपवून का ठेवता?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारण

फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद; मात्र आरेमध्ये बांधकाम करावेच लागेल, लपवून का ठेवता?

Surajya Digital
Last updated: 2020/12/20 at 6:39 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : कांजूरमार्ग मेट्रो कारशेडसाठी विरोधकांनी चर्चेदरम्यान कांजूर मार्गचा प्रश्न सोडवावा, आम्ही श्रेय द्यायला तयार आहोत, असं आवाहन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. हा प्रश्न श्रेय देण्याचा नाही तर, मुंबईकरांच्या सोयी सुविधेचा आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी मेट्रो कारशेड वादावरही भूमिका स्पष्ट केली तसंच, कारशेडचा वाद सोडवण्यासाठी विरोधकांनीही पुढं यावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. यावर फडणवीस यांनी लोकशाहीत चर्चेला आमची कायमच तयारी असते आणि चर्चेतून मार्गही निघतो, असं म्हणत फडणवीस यांनी एकाअर्थी मुख्यमंत्र्याच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनानंतर राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मेट्रो कारशेडचा प्रश्न श्रेयवादाचा नाही तर, मुंबईकरांच्या सोयी- सुविधेचा आहे. श्रेयासाठी काम करणे हा भाजपचा स्वभाव नाही. पण प्रश्न अपश्रेयाचा जरुर आहे, ते तुमच्या वाट्याला येऊ नये, हीच इच्छा. भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना दिशाभूल कशाला?,’ असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

* आरेमध्ये बांधकाम करावेच लागेल हे का लपवून ठेवता?

‘महाविकास आघाडी सरकारच्या समितीनेच सांगितलं की कांजूरमार्ग येथे कारशेड नेल्यास किती मोठे आर्थिक नुकसान होईल. शिवाय ४ वर्षांचा विलंब वेगळा. कांजूरमार्ग येथे कारशेड करायचे असेल तरी सुद्धा आरेमध्ये बांधकाम करावेच लागेल हे का लपवून ठेवता?,’ असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

बोगदे तयार करण्याचे काम आरेची जागा डोळ्यापुढे ठेवून करण्यात आले आहे आणि ते काम जवळपास ८० टक्के पूर्ण होत आहे. आता दुसरी कोणतीही जागा निवडली तरी पैसा व वेळ दोन्ही वाया जाणार, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शिवाय, मुंबईकरांनी आधीच खूप भोगलं आहे, त्यांना आणखी त्रास नको. हा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करु नका, ही हात जोडून विनंती आहे,’ असं ट्विट त्यांनी केलं आहे. आरेच्या जागेला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. आरेची जागा अंतिम झाल्यानंतर काम सुद्धा बरेच पुढे गेले आणि १०० कोटी रुपयांचा खर्चही झाला.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

फडणवीस भेटीनंतर दिलीप माने यांची जोरदार हल्लेबाजी; “सपकाळांना माझी ओळख नाही!”

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article तृणमूल काँग्रेसविरोधात एकही मतदान दिले तर रक्ताचे पाट वाहतील
Next Article भारताविरोधात भूमिका घेणा-या पंतप्रधानांना संसद करावी लागली बरखास्त, एप्रिल – मे दरम्यान निवडणुका

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?