Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मंत्रीमंडळ विस्तार : रात्रभर बैठकावर बैठका, फडणवीस दिल्लीला रवाना तर पवारही जाणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

मंत्रीमंडळ विस्तार : रात्रभर बैठकावर बैठका, फडणवीस दिल्लीला रवाना तर पवारही जाणार

Surajya Digital
Last updated: 2023/07/12 at 3:23 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

मुंबई : राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार अजून रखडला आहे. अनेकदा बैठकी घेऊनही यावर तोडगा निघाला नाही. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीसाठी रवाना झाले असून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे पण सायंकाळी दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. Cabinet expansion: Meeting after meeting all night, Fadnavis leaves for Delhi, Pawar will also go Devendra Fadnavis Ajit Pawar तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दिल्लीवारी करणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● अर्थखात्यासह ही 9 खाती मिळणार राष्ट्रवादीला ?

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्व नियोजित बैठका पुढे ढकलल्या आहेत. उद्या भाजप आणि शिवसेनेचे आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. या विस्तारानंतर लवकरच खातेवाटप देखील होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्याने बैठका होत आहेत. मंत्रीमंडळ विस्तार आणि खाते वाटपासंदर्भात या बैठका होत असल्याची माहिती आहे. मंगळवारी रात्री देखील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवास्थानी बैठक झाली. जवळपास दोन तास सुरू असलेल्या या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाबाबत अंतिम चर्चा झाल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप झाले आहे. छगन भुजबळांना ब-6 सिद्धगड, हसन मुश्रीफांना क-8 विशालगड, दिलीप वळसे पाटील यांना क-1 सुवर्णगड बंगला, धनंजय मुंडेंना क- 6 प्रचितगड, धर्मरावबाबा आत्राम यांना सुरुचि -3 बंगला, अनिल पाटलांना सुरुचि 8 तर संजय बनसोडे यांना सुरुचि 18 बंगला दिला आहे. आदिती तटकरेंना अद्याप बंगला देण्यात आलेला नाही. अजित पवारांकडे देवगिरी बंगलाच ठेवण्यात आल्याची माहिती आहे.

 

दरम्यान, अजित पवार यांनी बंड केल्याने राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांनी वाय बी चव्हाण सेंटर येथे जावून शरद पवार यांची भेट घेतली. युगेंद्र चव्हाण यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर लगेच अजित पवार श्रीनिवास पवार यांच्या घरी दाखल झाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

● अर्थखात्यासह ही 9 खाती मिळणार राष्ट्रवादीला ?

 

अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची खातेवाटपावर चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यानुसार शिंदे गटाचा विरोध असताना अर्थखात्यासह शिंदेगट व भाजपाकडील एकूण 9 खाती अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग, ग्रामविकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, महिला व बालकल्याण विभाग, पर्यटन विभाग, क्रीडा विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग, औषध प्रशासन विभाग या खात्यांचा समावेश आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजित पवार यांच्या कार्यशैलीला नाराज होऊन शिवसेनेचे आमदार बाहेर पडले होते, त्यातच बच्चू कडू यांचाही समावेश होता. बच्चू कडू यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारसह अजित पवार अर्थमंत्री हवे की नको याबाबत संवाद साधण्यात आला. त्यावेळी त्यांनी अनेक मोठे दावे केले आहेत.

आमच्या गटातील आमदारांना अजित पवार हे अर्थमंत्री नको आहेत, त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थमंत्री असताना निधीची पळवापळव केली म्हणून आम्ही इकडे आलो होता, असं सेनेच्या आमदारांचं मत आहे. ते मुख्यमंत्री झाले तरी आम्हाला सोयरसुतक नाही. आम्हाला स्वत:चं अस्तित्त्व आहे. आमच्या मतदारसंघात अजित पवार यांची बिलकुल ढळाढवळ आम्ही बिलकुल सहन करणार नाही, असंही बच्चू कडू म्हणाले.

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना लाभणार रवी नामक ‘दादा’ !

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

अपूर्व हिरे बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश

TAGGED: #Cabinet #expansion #Meeting #aftermeeting #allnight #Fadnavis #leaves #Delhi #Pawar #DevendraFadnavis #AjitPawar, #मंत्रीमंडळ #विस्तार #रात्रभर #बैठकावर #बैठका #फडणवीस #दिल्ली #रवाना #पवार #अजितपवार #देवेंद्रफडणवीस
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article प्रायमरी शिक्षणाचा ‘खेळखंडोबा’ शाळांचा ताबा घेणार ‘आजोबा’, राज्यात तब्बल १८ हजार ४६ पदे रिक्त
Next Article स्वतःसह वरिष्ठाच्या नावाने पैशाची लाच मागणा-या लाचखोर एएसआयला ठोकल्या बेड्या

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?