Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: fake documents बनावट कागदपत्रे तयार करून मृत महिलेच्या नावावरील जमीन केली खरेदी, पाचजणावर गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

fake documents बनावट कागदपत्रे तयार करून मृत महिलेच्या नावावरील जमीन केली खरेदी, पाचजणावर गुन्हा दाखल

Surajya Digital
Last updated: 2023/01/15 at 2:39 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला सोलापुरात गुप्तांग कापून निर्घृण खून

मोहोळ : १३ वर्षांपूर्वी मयत असलेल्या महिलेच्या नाववरील कुरुल ( ता. मोहोळ ) येथील जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून खरेदी केल्या प्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात पाच जणावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Purchase of land in the name of deceased woman by creating fake documents, case filed against five people, Mohol

 

याबाबत मोहोळ पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार कुरुल येथील वनमाला विठ्ठलराव गोळे यांच्या नावावर कुरुल येथील गट नं ९९२ मध्ये पाच हेक्टर ४८ आर येवढी जमीन आहे. या जमिनीची खरेदी २ ऑगस्ट २०२२ रोजी व्यवहार करण्यात आला. वस्तूत: वनमाला गोळे या २४ सप्टेंबर २००९ रोजी तेरखेडा ( ता. वाशी जिल्हा उस्मानाबाद) येथे मयत झाल्या आहेत. याची माहिती असून सुद्धा त्यांच्या जागी दुसरी महिला उभी करून तिचे बनावट आधार कार्ड तयार करून सदर जमिनीची खरेदी विक्री करण्यात आली.

 

१३ वर्षापूवी मयत झालेल्या वनमाला गोळे यांचे वारसदार विशाल गोळे यांनी आपली व शासनाची फसवणूक झाल्याने महेश मोहन जाधव (रा . देवळे ता. सांगोला ) व खरेदी खतातील साक्षीदार आबासाहेब सुधाकर पवार (रा. अंकोली ता. मोहोळ) व दत्तात्रय हणमंत सुरवशे (रा. रांझणी ता. पंढरपूर) एक अनोळखी महीला व एक एजंट दलाल अशा पाच जणावर मोहोळ पोलिस ठाण्यात भादवी ४२० ४६५ ४६८ ४७१ ३४ व सहकलम ८२ नोंदणी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याची फिर्याद मोहोळचे दुय्यम निबंधक धनंजय गोरे यांनी दाखल केली. यामुळे अधिकच खळबळ उडाली आहे. मयत वनमाला गोळे यांचे वारस बाहेरगावी राहतात याची माहिती घेवून हा प्रकार झाल्याची चर्चा आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

□ मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला सोलापुरात गुप्तांग कापून निर्घृण खून

 

सोलापूर : सोलापुरात एका अज्ञात व्यक्तीकडून ३४ वर्षीय तरुणाचा गुप्तांग कापून निर्घृण खून करण्यात आला आहे. ही घटना काल शुक्रवारी (ता. 13 ) रात्री २ च्या सुमारास उघडकीस आली.

मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या तरुणाच्या खुनामूळे सांगोला तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगोला शहरातील एखतपूर- आचकदाणी रोडवर हा प्रकार उघडकीस आलाय.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, संजय तुकाराम इंगोले (वय ३४, रा. एखतपूर) असे खून करण्यात आलेल्‍या तरुणाचे नाव आहे. सांगोला पोलीस स्टेशनचे कर्मचारी एखतपूर ते अचकदाणी रोडवर शनिवारी रात्री गस्तीवर होते. त्यावेळी त्यांना आचकदाणी रोड लगत एक तरुण मृत अवस्थेत दिसून आला. त्यांनी त्याच्या जवळ जाऊन पाहिले असता सदरचा प्रकार उघडकीस आला. पोलीस ठाण्यात नोंद झाली असून हा खून कोणाकडून करण्यात आला आहे, आणि का केला आहे हे अद्याप समोर आले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

 

You Might Also Like

राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव

सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त

विधिमंडळात 57,509 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात

पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ

TAGGED: #Purchaseofland #name #deceased #woman #bycreating #fakedocuments #casefiled #fivepeople #Mohol, #बनावट #कागदपत्रे #मृत #महिला #मोहोळ #नाव #जमीन #खरेदी #पाचजण #गुन्हा #दाखल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘इथेनॉल’ ठरतेय ‘गेम चेंजर’ : उत्पादनामध्ये महाराष्ट्राची ब्राझिल ‘पॅटर्न’ अवलंबण्याची तयारी
Next Article watch video खासदार सुप्रिया सुळे यांची साडी पेटली, पहा व्हिडिओ

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?