Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: टोमॅटोच्या भावामुळे शेतकऱ्याचा सोलापुरात रास्ता रोको, शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

टोमॅटोच्या भावामुळे शेतकऱ्याचा सोलापुरात रास्ता रोको, शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ

Surajya Digital
Last updated: 2023/10/01 at 7:18 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》 टोमँटोने आणली शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ

 

सोलापूर : टोमॅटोच्या कोसळलेल्या बाजारभावामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने पुणे-सोलापूर महामार्गावर टोमॅटो फेकून आंदोलन केले. शेटफळ येथे रस्त्यालगत झालेल्या या आंदोलनाने सुमारे अर्धा तास वाहतूक कोंडी निर्माण झाली. या हंगामात उत्पादित झालेल्या टोमॅटोस कवडी मोलाचा दर मिळत आहे. उत्पादनावर होणारा खर्चही भागत नाही. अशातच या शेतकऱ्याचा जवळपास पाच टन टोमॅटो व्यापाऱ्यांनी 40 पैसे प्रतिकिलो दराने मागितले. Due to the price of tomatoes, the farmer’s way to Solapur is blocked, the time for farmers to commit suicide has increased.

 

शेटफळ येथे माढा रस्त्यालगत झालेल्या या आंदोलनाने सुमारे अर्धा तास महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. या हंगामात उत्पादित झालेल्या टोमॅटोस कवडी मोलाचा दर मिळत आहे. उत्पादनावर होणारा खर्चही भागत नाही. अशातच शेटफळ येथील हनुमंत जाधव या शेतकऱ्याचा जवळपास पाच टन टोमॅटो व्यापाऱ्यांनी ४० पैसे प्रतिकिलो दराने मागितले. टोमॅटो तोडणी, वाहतूक व हमालीचा खर्च जवळपास प्रतिकिलो दीड रुपया होतो.

 

लागवडीपासून आजपर्यंत झालेला लाखो रुपयांचा खर्च वेगळाच. अशातच २५ किलोच्या टोमॅटोच्या कॅरेटला दहा रुपये दराने व्यापाऱ्यांनी मागितल्यामुळे संतप्त झालेल्या या शेतकऱ्याने सर्व टोमॅटो महामार्गावर फेकून दिले. संतप्त शेतकऱ्याच्या या आंदोलनास अनेक शेतकऱ्यांनी पाठिंबा व्यक्त करत टोमॅटो दराबाबत रोष व्यक्त केला. लाखो रुपये खर्च करून, रात्रंदिवस राबूनही श्रमाची किंमत होत नसल्याची उद्विग्नता या तरुण शेतकऱ्याच्या या अचानक झालेल्या आंदोलनात दिसून आली.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

》 टोमँटोने आणली शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ

 

 

¤ टोमँटो आयात करणारे पंतप्रधान मोदी टोमँटो निर्यात करणार का….? मोदी सरकार बळीराजाचे की नौकरदाराचे ?

 

मंगळवेढा : खरीप, रब्बी या दोन्ही हंगामात शेतकरी टोमॅटोचे उत्पादन घेतात. परंतु, सध्या दर ढासळले असून २ ते ३ रुपये प्रति किलो दराने विक्री करावी लागत आहे. बाजारपेठेतील घसरलेल्या दरामुळे शेतकरी शेतातील टोमॅटोही काढण्यास धजावत नाहीत. त्यामुळे शेतात व बाजारपेठेत लाल चिखल निर्माण होत आहे.

टोमॅटोचे उत्पन्न थेट सपाट जमिनीवर न घेता बेड तयार करून मल्चिंग पेपरवर घेतले जात आहे व त्यास दोरी व काठीच्या साह्याने बांधीव उत्पादन घेतल्याने दर्जेदार टोमॅटो उत्पादन तयार होते. त्यामुळे या टोमॅटोला मुंबई, बेंगलोर, चेन्नई, हैदराबाद, दिल्ली,उत्तरप्रदेश, दक्षिण भारतासह परदेशातही मागणी मोठी असते.

सतत ढगाळ वातावरण व मध्यंतरी झालेला पाऊस तसेच थंडीची तीव्रता कमी झाल्याने लागवड वाढली आहे. एका महिन्यापूर्वी टोमॅटोच्या किमती या गगनाला भिडल्या होत्या. अनेक ग्राहकांनी तर टोमॅटो खरेदी करणे बंद केले होते. त्यामुळे मोदी सरकारने परदेशातून टोमँटो आयात केला होता. पण आता टोमॅटोचे भाव कोसळले आहेत. शेतक-यांचा उत्पादन खर्चही निघत नाही, बाजारपेठेत टोमँटोची आवक वाढली आहे. त्यामुळे व्यापारी टोमँटोकडे पाठ करीत आहेत. त्यामुळे टोमँटो ऊत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

तीन महिन्यात टोमँटोची करावी लागणारी तोडणी दररोज आभाळ येत असल्यामुळे एकाच महिन्यात करावी लागत आहे. त्याचा परिणाम बाजारपेठेत झाल्यामुळे आवक अनेक पटीने वाढली आहे. त्याचा परिणाम मार्केटवर झाल्यामुळे दर कोसळले आहेत. तोडणीचाही खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांनी टोमँटोची तोडणी बंद केली आहे.

 

टोमँटो प्लॉट सांभाळण्यासाठी फवारणी करावी लागते परंतू त्याचा खर्च आता परवडत नाही.  बाजारात मागणी घटली आणि आवक वाढली आहे. बाजार सुधारण्यास काही कालावधी लागेल असे व्यापारी सांगत आहेत. दर सुधारतील पण शेतकरी ऊद्वस्त झाल्यावर. शासन जागे  होईल व टोमँटो निर्यात करेल शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर, अशी संतप्त भावना व्यक्त होत आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #price #tomatoes #farmer's #way #Solapur #blocked #time #farmers #commit #suicide #increased., #टोमॅटो #भाव #शेतकरी #सोलापूर #रास्तारोको #शेतकरी #आत्महत्या #वेळ, #सोलापूर #माढा #शेटफळ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी
Next Article गुरु-शिष्यांमध्ये मनोमिलन ? सोलापुरातच घडला योगायोग

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?