मुंबई, 29 जुलै – परभणी जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांनी मंगळवारी आपल्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईतील पक्ष कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला.
या वेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. संजय केनेकर, आ. विक्रांत पाटील, माधवी नाईक, मराठवाडा विभागीय संघटन मंत्री संजय कोडगे, ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, अमर राजुरकर, भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, परभणी महानगर अध्यक्ष शिवाजी भरोसे, आणि माध्यम प्रमुख नवनाथ बन आदी मान्यवर उपस्थित होते.
वरपुडकरांचा अनुभव पक्षाच्या पाठीशी – रविंद्र चव्हाण
या वेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले, “सुरेश वरपुडकर हे सामाजिक बांधिलकी जपणारे आणि अनुभवी नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.”
ते पुढे म्हणाले की, “महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रात अग्रगण्य बनवण्यासाठी भाजप सातत्याने प्रयत्न करत आहे. वरपुडकर यांच्या प्रवेशामुळे परभणीतील संघटना अधिक मजबूत होईल.”
वरपुडकरांसह अनेकांचा प्रवेश
सुरेश वरपुडकर यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये हे प्रमुख आहेत:
-
समशेर वरपुडकर – जिल्हा परिषद उपाध्यक्ष
-
धोंडीराम चव्हाण – माजी जिल्हा परिषद सभापती
-
तुकाराम वाघ – माजी पंचायत समिती सभापती
-
प्रेरणा वरपुडकर – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक
-
द्वारकाबाई कांबळे – माजी समाज कल्याण सभापती
-
अजय चव्हाण – कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती
-
तुळशीराम सामाले – माजी जिल्हा परिषद सदस्य
-
रामेश्वर कटिंग – माजी पंचायत समिती उपसभापती
-
मधुकर लाड, दिलीपराव साबळे – माजी पंचायत समिती सदस्य
भाजपने सर्व नवप्रवेशितांचा पक्षात सन्मान आणि स्थान राखले जाईल, अशी ग्वाही यावेळी दिली