भंडारा, 30 मे (हिं.स.) – भंडारा जिल्ह्याच्या जवाहरनगर पोलीस स्टेशन अंतर्गत फिर्यादी रोहित गोमासे आणि त्याचे दोन सहकारी आयशर ट्रकने नागपूरकडे जात असता लघुशंकेकरिता पिपरी फाटा येथे थांबले होते. चार आरोपी त्यांनी त्या ठिकाणी मोटार सायकलने येऊन चाकूचा धाक दाखवून तिघांपैकी दोघांना थापड बुक्क्यांनी मारहाण केली.
त्यांचे खिशामधून नगदी २५० रुपये दोन मोबाईल आणि फोन पे द्वारे २३ हजार रुपये असा एकूण ५३२५०/- रुपयांचा मुद्देमाल जबरदस्ती हिसकावून त्यांना मारहाण करून सोडून दिले. सदर गुन्ह्याची माहिती पोलिस स्टेशनला प्राप्त होताच लागलीच पोलीस पथकद्वारे आरोपीतांचा शोध करून सदर गुन्ह्यात समाविष्ट असलेले चार आरोपीना अटक करण्यात आली आहे.
—————