सोलापूर-विशेष प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सत्तेवर आल्यानंतर देशवासियांना पहिला दणका दिला. सरकारने सोमवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली. हे बदल आज मंगळवारपासून लागू होणार आहेत. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 13 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 10 रुपये करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. हे कमी म्हणून की काय लागोपाठ एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यामुळे देशभरात महागाईचा भडका उडणार आहे.त्यात सामान्य वर्गाचे कंबरडे मोडून पडणार आहे.
उत्पादन शुल्कात वाढ केल्याने किरकोळ किमतींवर काय परिणाम होईल, हे आदेशात सांगण्यात आलेले नाही.
परंतु, पीटीआय या वृत्त संस्थेने उद्योग सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, किरकोळ किमतींमध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे. आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये आधीच कपात झालेली आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क वाढीचा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.
अमेरिकेने आयात शुल्क लादल्याने शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळतेय. तसेच, इतर उत्पादनांवरीलही किमती वाढण्याची शक्यता आहे. असे असतानाच केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवल्याने याचा परिणाम पेट्रोल डिझेलच्या किरकोळ किमतीवर झाल्यास सामान्य नागरिकांचे बजेट हलण्याची शक्यता आहे. यामुळे प्रवासासह इतर अनेक सेवा सुविधा महाग होतील.
पेट्रोल -डिझेलच्या किरकोळ किमती वाढणार नाहीत
दरम्यान, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने म्हटले आहे की, ‘‘आज उत्पादन शुल्क दरात वाढ झाल्यानंतर, पीएसयू तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत कोणतीही वाढ होणार नाही, असे कळवले आहे.’’ जागतिक तेलाच्या किमती घसरल्यामुळे डिसेंबर 2024 मध्ये सरकारने स्थानिक पातळीवर उत्पादित कच्च्या तेल आणि इंधन निर्यातीवरील अनपेक्षित नङ्गा कर काढून टाकला होता.
पेट्रोल, डिझेल दरवाढीनंतर
आणखी एक झटका
सोमवारी दुपारी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला होता. पाठोपाठ एलपीजी गॅस सिलिंडर 50 रुपयांनी महागला. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ तत्काळ प्रभावाने लागू करण्यात येणार आहे. थोड्या वेळापूर्वीच सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला होता.
महत्वाची बाब म्हणजे ही दरवाढ प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (पीएमयूवाय) लाभार्थी आणि गैर-लाभार्थी दोघांनाही लागू आहे. सुधारित किमती 8 एप्रिलपासून लागू होणार आहेत. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी गॅस सिलिंडरची किंमत 500 रुपयांवरून 550 रुपयांपर्यंत वाढेल. इतर ग्राहकांसाठी, ती 803 रुपयांवरून 853 रुपयांपर्यंत वाढणार असल्याची माहिती, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्ाी हरदीप सिंग पुरी यांनी दिली. पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढीचा उद्देश ग्राहकांवर भार टाकण्याचा नाही. त्याचबरोबर अनुदानित गॅसच्या किमती वाढविल्यामुळे तेल विपणन कंपन्यांना झालेल्या 43 हजार कोटी रुपयांच्या तोट्याची भरपाई करण्यास मदत करणे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरत असताना देखील सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केली आहे. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 13 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर 10 रुपये गोळा केले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत घट अपेक्षित होती. परंतु सरकारने दर कमी करण्याऐवजी कर वाढविला आहे.
गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्यानंतर आता सामान्यांना सरकारने आणखी एक झटका दिला आहे. 8 एप्रिलपासून गॅस सिलिंडर 10 किंवा 20 नाही तर 50 रुपयांनी महाग झाला आहे. सरकारने घरगुती वापरासाठीचा एलपीजी गॅस सिलिंडर 50 रुपये महाग केल्याचं जाहीर केलं आहे. उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत 503 रुपयांना मिळणारा सिलिंडर आता 553 रुपयांना मिळणार आहे तर ही योजना सोडून असलेला एक सिलिंडर 803 रुपयांवरुन 853 रुपये इतका झाला आहे. 8 एप्रिलपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहहे.
8 एप्रिलपासून नवे दर होणार लागू
पेट्रोलियम मंत्र्ाी हरदीप सिंह पुरी यांनी पत्र्ाकारांशी संवाद साधला. आंतरराष्ट्रीय किंमती वाढत आहेत. त्याामुळे 8 एप्रिलपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये 50 रुपयांची वाढ केली जाते आहे. स्वयंपाकाला लागणार्या गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत असं त्याांनी जाहीर केलं आहे.घरगुती गॅस सिलिंडर 50 रुपयांनी महाग झाला आहे. आज म्हणजेच सोमवार 7 एप्रिल रोजी पेट्रोलियम मंत्र्ाी हरदीप सिंग पुरी यांनी ही माहिती दिली. सध्या दिल्लीत गॅस सिलिंडर 803 रुपयांना उपलब्ध आहे. किमती वाढल्यानंतर ही किंमत 853 रुपये होईल. तर मुंबईत हीच किंमत आधी 802.50 रुपये होती, ती आता 852.50 रुपये होईल.
महिला दिनी केली होती कपात सरकारने मागील वर्षी म्हणजे 8 मार्च 2024 रोजी महिला दिनी सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांची कपात केली होती. त्याावेळी दिल्लीत सिलिंडरची किंमत 903 रुपये होती. 1 एप्रिल रोजी तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 44.50 रुपयांची कपात केली होती. दिल्लीत त्यााची किंमत 41 ने कमी होऊन 1762 झाली. पूर्वी ते 1803 मध्ये उपलब्ध होते. कोलकातामध्ये ते 44.50 ने कमी होऊन 1868.50 रुपयांना मिळत आहे, पूर्वी त्यााची किंमत 1913 होती.
फडणवीस सरकार काय करणार महाराष्ट्र आणि शेजारच्या कर्नाटक या दोनही सरकारांकडे पैसा नाही हे लपून राहिलेले नाही.कर्नाटक सरकारने आर्थिक तूट भरून काढण्यासाठी पेट्रोल-डिझेलवर 3 टक्के व्हॅट लावला आहे.त्यामुळे तिथेही पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत.हा व्हॅट लागू करण्याअगोदर कर्नाटकात पेट्रोलचे दर कमी आहेत म्हणून तिथून पेट्रोल भरून आणण्याची मानसिकता महाराष्ट्र राज्याची झाली होती आता मात्र दोनही राज्यांचे दर इक्वल झाले आहेत.केवळ 20 ते 50 पैशांचा फरक आहे.आता महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडे पैसा नाहीय.त्यामुळे फडणवीस सरकार पेट्रोलवर व्हॅट लावून सामान्यांच्या खिशाला कात्री लावणार काय याकडे जाणकारांचे लक्ष लागून आहे.