पुणे, 26 एप्रिल (हिं.स.)।
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बिमोड करून शत्रूला चोख उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शक्ती द्यावी, अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी केली असल्याचे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी आज पुण्यात सांगितले.
जे. पी. नड्डा यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते गणरायाला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर नड्डा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रसाने आदी उपस्थित होते.