Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गौरवशाली बहुमान… सामान्य कार्यकर्ताही मुख्यमंत्री होऊ शकतो
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsब्लॉगराजकारण

गौरवशाली बहुमान… सामान्य कार्यकर्ताही मुख्यमंत्री होऊ शकतो

Surajya Digital
Last updated: 2022/07/01 at 1:48 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
महाराष्ट्राचे तिसावे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी शपथग्रहण केले. मोदी-शहा या जोडीचा धक्कातंत्र महाराष्ट्राने पहिल्यांदाच अनुभवला. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार, असा अंदाज बांधला गेला होता. दिल्लीच्या हायकमांडचा आदेश येताच भाजप नेते चक्रावले.  Glorious honor … An ordinary worker can become the Chief Ministerस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…– दैनिक सुराज्य, संपादकीय लेख

महाराष्ट्राचे तिसावे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी शपथग्रहण केले. मोदी-शहा या जोडीचा धक्कातंत्र महाराष्ट्राने पहिल्यांदाच अनुभवला. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार, असा अंदाज बांधला गेला होता. दिल्लीच्या हायकमांडचा आदेश येताच भाजप नेते चक्रावले.  Glorious honor … An ordinary worker can become the Chief Minister

 

राज्यात एकच खळबळ उडाली. कारण शिंदे यांचे नाव कसे काय आले ? या प्रश्नाने साऱ्यांनाच बुचकळ्यात टाकले पण उध्दव ठाकरे यांना धडा देण्यासाठी भाजप श्रेष्ठींनी हा नवा डाव टाकल्याची शक्यता नाकारता येत नाही. पण राज्यातील सामान्यांसाठी एक आनंदाची बाब म्हणजे शिंदेंसारख्या एका निष्ठावंत नेत्याला भाजप नेत्यांनी न्याय दिला. शिवसेनेत निष्ठावंतांची कदर होत नाही पण आम्ही करतो, असा संदेश या निर्णयातून दिल्लीश्वरांनी राज्यात पोहचवला आहे.

 

शिवसेनेतील ज्येष्ठत्व पाहात शिंदे हेच मुख्यमंत्री व्हायला हवे होते. गेली अनेक दशके शिवसेनेचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून शिंदे यांनी पक्ष वाढवण्यासाठी रक्ताचे पाणी केले आहे. ठाकरे घराण्यानंतर ते सर्वात शक्तिशाली शिवसैनिक मानले जातात. २०१९ मध्ये ठाकरेंनी मुख्यमंत्री होण्याचे मान्य केले नसते तर आज शिंदे हे त्याच खुर्चीत दिसले असते. सातारा ते ठाणे असा त्यांचा प्रवास विलक्षण आहे.

सातारा जिल्ह्यातील पहाडी जावळी ही त्यांची जन्मभूमी. ठाण्यात त्यांनी मंगला हायस्कूल आणि कनिष्ट महाविद्यालय येथे ११ वीपर्यंत शिक्षण घेतले. १९८० मध्ये त्यांनी शाखाप्रमुख म्हणून शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे हे ठाण्यातील कोपरी – पाचपाखाडी मतदारसंघातून चार वेळा आमदार झाले. पक्षासाठी त्यांनी तुरुंगवासही सोसला. कट्टर आणि निष्ठावान शिवसैनिक अशी त्यांची प्रतिमा आहे. ठाण्यात शिंदे यांचा प्रभाव असा आहे की लोकसभा निवडणूक असो की नागरी निवडणूक. त्यांचा उमेदवार नेहमीच जिंकतो.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

 

२०१९ मध्ये शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडली तेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय होत नव्हता. निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव यांनी शिंदे यांची विधानसभेतील विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली. तेव्हा शिंदे यांना मुख्यमंत्री केले जाईल, असे वाटले होते. पण शरद पवार आणि सोनिया गांधी यांना उद्धव यांनी मुख्यमंत्री व्हावे, असे वाटत होते. मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी उद्धव यांच्यावर कुटुंबीयांचा दबाव होता. त्यामुळे शिंदे यांना घुसमट सहन करावी लागली. अखेर आता त्यांनी बाजी मारली. ‘भगवान की घर में देह है, लकिन अंधेर नहीं’, याचा प्रत्यय शिंदे यांना आला.

 

शिंदे यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिंदे यांनी शिवसेनेकडून बंड केले. त्यावेळी त्यांच्यावर अनेकांनी टिकास्त्र सोडले. पण आता भाजपने शिंदे यांना हा मान देऊन मास्टर स्ट्रोक खेळला आहे. फडणवीस यांच्या या खेळीमुळे महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे. संपूर्ण ठाकरे सरकारला वेठीस धरणारे शिंदे म्हणजे, कडवट शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे खंदे कार्यकर्ते. आनंद दिघेंसोबत आपला राजकीय प्रवास सुरु करणारे शिंदे गेली अनेक वर्षे शिवसेनेसोबत सक्रिय राजकारणात आहेत. आनंद दिघेंनंतर ठाण्यात शिवसेना वाढवण्याचे काम त्यांनी एकहाती केले.

 

सुरुवातीच्या काळात ते ठाण्याच्या प्रसिद्ध वागळे इस्टेटमधील एका माशांचा कंपनीत सुपरव्हायझर म्हणून कामाला होते. कालांतराने त्यांनी ही नोकरी सोडत आत्मनिर्भर व्हायचे ठरवले. ठाण्यात ऑटो रिक्षा चालवू लागले. काम करत असताना त्यांच्या आयुष्याला दोन व्यक्तींमुळे कलाटणी मिळाली. त्या व्यक्ती म्हणजे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे. माझा सच्चा सैनिक मुख्यमंत्री झाल्याचे पाहून बाळासाहेब असते तर त्यांना खूप खूप आनंद झाला असता. सामान्य कार्यकर्ताही मुख्यमंत्री होऊ शकतो ही वार्ता ऐकून आम्हालाही मनस्वी आनंद झाला आहे. शिंदे यांना मिळालेला हा बहुमान महाराष्ट्रासाठी भूषणावह आहे. त्यांच्या कारकिर्दीला आमच्या मनोमन शुभेच्छा.

📝 📝 📜

– दैनिक सुराज्य, संपादकीय लेख

 

 

You Might Also Like

शरद पवार गट एका विचारधारेवर चालणारा पक्ष – प्रा. डॉ.हेमंत देशमुख

हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्रच मोर्चा काढणार – संजय राऊत

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर

फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये

TAGGED: #Glorious #honor #ordinary #worker #ChiefMinister #maharashtra, #गौरवशाली #बहुमान #सामान्य #कार्यकर्ता #मुख्यमंत्री #महाराष्ट्र
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सरकार बदलताच शरद पवारांना मोठा धक्का, आली आयकराची नोटीस
Next Article ‘नवीन मुख्यमंत्री कारकिर्द 11 जुलैपर्यंत’

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?