मुंबई : ‘ देशात पेट्रोल-डिझेलच्या दराने शंभरी गाठली आहे. LPG गॅसचे दरही वाढले आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईट क्रास्टो यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना चिमटा काढला. पेट्रोल पंप ‘गुडमॉर्निंग अण्णा’ बोलतोय तर गॅस सिलेंडर ‘आमच्यासाठी आंदोलन कधी?’ असा प्रश्न शेजारी बसलेल्या अण्णा हजारे यांना विचारत असल्याचे व्यंगचित्र काढत अण्णांना चिमटा काढला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईट क्रास्टो यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनाही चिमटा काढलाय. पेट्रोल पंप ‘गुडमॉर्निंग अण्णा’ बोलतोय तर गॅस सिलेंडर ‘आमच्यासाठी आंदोलन कधी?’ असा प्रश्न शेजारी बसलेल्या अण्णा हजारे यांना विचारत असल्याचे व्यंगचित्र काढत क्लाईड क्रास्टो यांनी अण्णा हजारेंना फटकारलंय. सध्या हे खूप व्हायरल केले जात आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एवढ्या दिवसात कधी तोंडातून एक शब्द बाहेर काढला नाही, असा आरोप क्रास्टो यांनी केलाय. मात्र, राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये म्हणून चांगलं काम करणाऱ्या राज्य सरकारच्याविरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर क्लाईड क्रास्टो यांनी आपल्या व्यंगचित्राच्या कुंचल्यातून अण्णा हजारे यांना वाढत्या पेट्रोल – डिझेल व गॅसच्या दरवाढीवर जोरदार चिमटा काढून कुंचल्याचे फटकारे मारले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हे व्यंगचित्र अण्णांना पेट्रोल पंप गुडमॉर्निंग अण्णा बोलून जागा करत आहे. तर चक्क गॅस सिलेंडरच ‘आमच्यासाठी आंदोलन कधी?’ असा प्रश्न करत आहे. क्लाईड क्रास्टो यांच्या कुंचल्यातून रेखाटलेल्या व्यंगचित्रातून आतातरी अण्णा हजारे बोध घेतील का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व्यंगचित्र पोस्ट करुन विचारत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी गावात नुकते शनिवारी हजारे यांनी असे म्हटले होते की, मंदिरे सुरु करण्यासंदर्भात त्यांनी काही लोकांच्या एका प्रतिनिधीमंडळाची भेट घेतली. त्यांनी असे ही म्हटले होते की, राज्य सरकार मंदिरे का सुरु करत नाही आहे? लोकांसाठी मंदिर सुरु करण्यासाठी राज्य सरकारला त्यात काय धोका दिसत आहे? यामागे जर कोविडचे कारण असेल तर दारुच्या दुकानांच्या बाहेर मोठ्या रांगा का लागतात. मंदिरांवरील प्रतिबंध हटवण्यासाठी जर आंदोलन केले जात असेल तर त्यामध्ये मी सुद्धा समर्थन देईल. त्याचसोबत तुम्ही राज्यात दारुची दुकाने सुरु करु शकता पण मंदिरे का नाही, असे ही अण्णा हजारे यांनी म्हटले होते.