Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नवजात बालकांच्या दुर्दैवी मृत्यूस महाराष्ट्र सरकार जबाबदार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

नवजात बालकांच्या दुर्दैवी मृत्यूस महाराष्ट्र सरकार जबाबदार

Surajya Digital
Last updated: 2021/01/09 at 5:34 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा दहा निष्पाप बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही हत्या आहे, असा आरोप भाजपाचे नेते राम कदम यांनी केला आहे.

या घटनेबाबत दु:ख व्यक्त करत भाजपाचे नेते राम कदम यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. भंडारा जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये 10 निष्पाप बालकांचा दुर्दैवी मृत्यू हा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे. ही हत्या आहे. त्याला जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे, अशी टीका भाजप नेते राम कदम यांनी केली आहे.

भाजपाचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवजात बालकाच्या निधनावर दु:ख व्यक्त करत या घटनेची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.

भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत सुमारे १० बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारी आहे. या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच, त्यांनी ही घटना समजात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, याबाबत जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.

याचबरोबर, या घटनेबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच, या आगीच्या घटनेची चौकशी करण्यात येईल आणि मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री जवळपास दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. धुरामुळे गुदमरुन या बालकांचा मृत्यू झाल्याचे समजते. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #नवजात #बालकांच्या #दुर्दैवी #मृत्यूस #महाराष्ट्र #सरकार #जबाबदार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूरला अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांसाठी 250 कोटींचा निधी प्राप्त
Next Article जगात भारी कोल्हापुरी! प्रणव भोपळेचा दुस-यांदा जागतिक विक्रम

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?