Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कंटेनरचे हेड तुटल्याने बाळे पुलाजवळ घडला विचित्र अपघात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

कंटेनरचे हेड तुटल्याने बाळे पुलाजवळ घडला विचित्र अपघात

Surajya Digital
Last updated: 2023/01/24 at 8:18 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● स्वस्तात सोन्याच्या नाण्याचे आमिष दाखवून फसवणूक 

सोलापूर : सोलापूर शहरात रविवारी झालेल्या अपघाताची घटना ताजी असतानाच सोमवारी (ता. 23) सायंकाळी पाच वाजता कंटेनरचा हेड तुटल्याने कंटेनर डिव्हायडरला जाऊन धडकली.त्यानंतर इनोवा कार आणि शिवशाही बस धडकून विचित्र अपघात बाळे पुलावर घडला. A strange accident happened near Bale Bridge, Solapur, when the head of the container broke

सोलापूर शहर व जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे, ही चिंतेची बाब आहे.त्यातच रविवारी डंपर खाली चिरडून दहा वर्षे चिमुकल्याचा मृत्यू झाला.पुन्हा एकदा जड वाहतुकीने एका निष्पाप मुलाचा बळी घेतला आहे,अशी चर्चा होती. त्यात सोमवारी पुन्हा बाळे पुलावर विचित्र अपघात घडला.

कंटेनरच्या समोरील बाजूचे हेड तुटल्याने कंटेनर फिरून डिव्हायडरला धडकला. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. या कंटेनरला त्या पाठोपाठ येणाऱ्या इनोव्हा कारने धडक दिली. इतकेच नव्हे तर त्या इनोवा कारला मागून येणाऱ्या शिवशाही बसनेही ठोकले. शिवशाही बसच्या चालकाने वेळीच ब्रेक मारल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

काही वेळ बाळे पुलावर वाहतूक कोंडी झाले होती. मात्र त्या ठिकाणी वाहतूक शाखेचे पोलीस व फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल होताच वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेची प्राथमिक नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

● स्वस्तात सोन्याच्या नाण्याचे आमिष दाखवून फसवणूक 

मोहोळ – स्वस्तात सोन्याची नाणी विकायची असल्याचे सांगून खंडोबाचीवाडी ता मोहोळ येथील एकाची पाच लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी दोघा जणांविरोधात मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार शिवाजी श्रीमंत सुतार (वय ३८, रा . खंडोबाचीवाडी ता मोहोळ) यांना संशयित संतोष व मुकदम गायकवाड या दोघा साथीदारांनी सोन्याचे एक खरे नाणे दाखवून अन्य नाणी स्वस्तात देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर सुतार हे आमडपूर (ता. चिखली , जि. बुलढाणा) येथील आमडापूर गावाशेजारील बल्लाळ देवीच्या बाजूला माळरानावरील रस्त्यावर आले.
याठिकाणी संशयितांनी पाच लाखांची रक्कम स्वीकारून सुतार यांना ७०० नाणी दिली. नाणी घेऊन सुतार हे मुळ गावी परतले या नाण्यांची तपासणी केल्यानंतर ते पिवळ्या धातूची नकली नाणी निघाली. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर सुतार यांच्या तक्रारीनंतर संतोष व मुकादम गायकवाड नामक या दोघाविरोधात मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास मोहोळ पोलिस करीत आहेत.

 

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #strange #accident #happened #Bale #Bridge #Solapur #head #container #broke, #कंटेनर #हेड #तुटल्याने #बाळे #पुलाजवळ #विचित्र #अपघात #सोलापूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Solapur court विवाहितेवर अत्याचार करून पैसे, दागिन्यांची लुट; तरुणाचा जामीन फेटाळला
Next Article सोन्याच्या बांगड्या कट करून चोरी; सराफासह सातजणांची टोळी जेरबंद

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?