Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: हेडफोनने केला तरुणांचा घात; रेल्वेच्या अपघातात मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

हेडफोनने केला तरुणांचा घात; रेल्वेच्या अपघातात मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2023/03/28 at 9:25 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

पंढरपूर – कानात हेडफोन घालून रूळ ओलांडणाऱ्या तरुणास रेल्वेचा धक्का बसल्यामुळे जागीच मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी (ता.28) सकाळी घडली. Ambush youths with headphones; Death in train accident Solapur Pandharpur Sangola Miraj Road

Contents
● वागदरी रथोत्सव दुर्घटनेत निष्काळजीपणाचा ठेवला ठपका; पंचकमिटीवर गुन्हा दाखलस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● मिरज – सांगोला रस्त्यावर पिकअप दुचाकी अपघातात एक ठार एक जखमी

या अपघातात जुना कासेगाव रस्ता येथील जयेश जाधव (वय 32 ) याचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पंढरपूर मिरज ही डेमो रेल्वे येथील रेल्वे स्थानकातून निघाली असता उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोरील रुळावरून जयेश जाधव हा कानामध्ये हेडफोन घालून रुळावरून जात होता.

 

आपल्याच नादात असणाऱ्या जयेशचे रेल्वेच्या आवाजाकडे लक्ष गेले नाही. यामुळे इंजिनची जोरदार धडक बसल्यामुळे तो जागीच ठार झाला. या अपघातामध्ये जयेशचा पाय गुडघ्यापासून तुटून रुळाच्या बाजूला पडला होता. तसेच त्याच्या डोक्याला जोरदार मार लागला होता. घटनेनंतर तातडीने रेल्वे पोलिसांनी धाव घेतली.

 

● वागदरी रथोत्सव दुर्घटनेत निष्काळजीपणाचा ठेवला ठपका; पंचकमिटीवर गुन्हा दाखल

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील ग्रामदैवत श्री परमेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त काढलेल्या रथोत्सवात दगडी चाक निखळून दोघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी देवस्थान समितीच्या पाचजणांवर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यामध्ये सोमवारी (ता. 27) पहाटे दोन वाजता गुन्हा दाखल झाला.

परमेश्वर यात्रा कमिटीच्या रथोत्सव समितीमधील मल्लप्पा निरोळी, सिद्धाराम बटगेरी, श्रीशैल दुर्गे, नागप्पा घोळसगाव व शिवपुत्र दड्ढे (सर्व रा.वागदरी) या पाचजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

 

रथोत्सव समितीमधील पंचकमिटीने रथोत्सवापूर्वी निष्काळजीपणा केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद पोलीस शिपाई राम चौधरी यांनी दिली. ग्रामदैवत श्री परमेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त रविवारी सायंकाळी रथोत्सव मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रथोत्सव मिरवणूक. निघत असताना अचानक रथाचा लोखंडी रॉड (अक्सल) तुटून पुढचे दगडी चाक निखळून अपघात झाला होता. यामध्ये गंगाराम तिप्पण्णा मंजुळकर- गाडीवडर व इरप्पा (संजय) गिरमल नंदे हे दोघे ठार झाले होते. तर सहायक पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी हे जखमी झाले. या दुर्घटनेनंतर वागदरी गावावर पसरली. शोककळा

दरम्यान, पंचकमिटीवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतचा तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचे फौजदार चंद्रकांत पुजारी यांनी सांगितले.

 

 

● मिरज – सांगोला रस्त्यावर पिकअप दुचाकी अपघातात एक ठार एक जखमी

सांगोला : मिरज – सांगोला या राष्ट्रीय महामार्गावरील कमलापूर गावाजवळ अज्ञात पिकअप वाहनाने दुचाकी वाहनास पाठीमागून धडक दिल्याने यात एक मयत आणि एक जखमी झाला. ही घटना आज मंगळवारी (ता .28) सकाळी दहाच्या सुमारास घडली.

भीमराव लक्ष्मण करपे असे मयताचे तर शंकर मच्छिंद्र चौगुले असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथील भीमराव लक्ष्मण करपे हा मंगळवेढा येथील नातेवाईक शंकर मच्छिंद्र चौगुले यांच्या मालकीच्या मोटारसायकलवरून कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील बिरोबा यात्रेला गेले होते.

तेथून आज मंगळवारी सकाळी परत आपल्या गावी येत असता मिरज – सांगोला या राष्ट्रीय महामार्गावरील कमलापूर या ठिकाणी सकाळी दहाच्या सुमारास अज्ञात पिक अप वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने भीमराव करपे हा जागीच मयत झाला. तर शंकर चौगुले हा गंभीर जखमी झाला असून सांगोला येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहे. याबाबत दादासाहेब लक्ष्मण करपे यांनी सांगोला पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात वाहन चालकाविरुद्ध फिर्याद दाखल केली असून पुढील तपास सांगोला पोलीस करीत आहेत.

You Might Also Like

सोलापूर : लक्ष्मण हाके समाजात जातीय विष पेरतात – उमेश पाटील

शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देणार – खा प्रणिती शिंदे

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट

सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार

सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू

TAGGED: #Ambush #youths #headphones #Death #train #accident #Solapur #Pandharpur #Sangola #MirajRoad, #पंढरपूर #सोलापूर #हेडफोन #तरुण #घात #रेल्वे #अपघात #मृत्यू #सांगोला-मिरजरोड
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर : दुहेरी जलवाहिनीचे प्रकल्प आता लवकरच लागणार मार्गी, दोन मक्तेदारांच्या फंद्यात रखडले प्रकल्प
Next Article कशासाठी ? ठाकरे सरकार पाडण्यासाठी, फडणवीसांसोबत दोन वर्षात दीडशे बैठका

Latest News

लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे निधन; पुण्यात अंत्यसंस्कार
महाराष्ट्र July 16, 2025
फौजा सिंग यांचा हिट अँड रन प्रकरणात एनआरआय अमृतपाल सिंग ढिल्लनला अटक
Top News July 16, 2025
देशात पहिली टेस्ला कार दाखल; प्रताप सरनाईक बनणार पहिले ग्राहक?
महाराष्ट्र July 16, 2025
Uddhav Thackeray's advice to Danve
उद्धव ठाकरेंचा दानवे यांना सल्ला – “पुन्हा या, पण आपल्या पक्षातूनच या”
राजकारण July 16, 2025
उद्धव ठाकरे यांना सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव; देवेंद्र फडणवीस यांची चर्चेला उघड दार
राजकारण July 16, 2025
भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध थांबले नसते तर पुढे अण्वस्त्र युद्ध झालं असतं – डोनाल्ड ट्रम्प
देश - विदेश July 15, 2025
निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा पुढे ढकलली
देश - विदेश July 15, 2025
पहलगाम हल्ला : आयएसआय व लश्कर-ए-तोयबाचा कट
देश - विदेश July 15, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?