Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गेल्या 11 वर्षात सरकार गरिबांची सेवा, सुशासन, कल्याणासाठी समर्पित – पंतप्रधान
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

गेल्या 11 वर्षात सरकार गरिबांची सेवा, सुशासन, कल्याणासाठी समर्पित – पंतप्रधान

admin
Last updated: 2025/06/05 at 5:53 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 5 जून (हिं.स.) –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए सरकारची गरीब कल्याणासाठी असलेली अतूट बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली. देशात परिवर्तनकारी आणि सर्वसमावेशक शासनाची 11 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, ते म्हणाले की, सक्षमीकरण, पायाभूत सुविधा आणि समावेशकतेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या एका कनवाळू सरकारने 25 कोटींहून अधिक लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

पंतप्रधानांनी पीएम आवास योजना, पीएम उज्ज्वला योजना, जन धन योजना आणि आयुष्मान भारत यांसारख्या परिवर्तनकारी योजनांच्या परिणामांना अधोरेखित केले ज्या योजनांमुळे गृहनिर्माण, स्वच्छ स्वयंपाकाचे इंधन, बँकिंग आणि आरोग्यसेवेची उपलब्धता वाढली आहे. त्यांनी लाभांचे पारदर्शक आणि कार्यक्षम वितरण सुनिश्चित करणाऱ्या थेट लाभ हस्तांतरण (DBT), डिजिटल समावेशकता आणि ग्रामीण पायाभूत सुविधांचे महत्त्व देखील अधोरेखित केले.

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले

“गरिबांच्या कल्याणासाठी समर्पित, एक कनवाळू सरकार!

गेल्या दशकात, एनडीए सरकारने सक्षमीकरण, पायाभूत सुविधा आणि सर्वसमावेशकतेवर लक्ष केंद्रित करून, अनेक लोकांना गरिबीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी परिवर्तनकारक पावले उचलली आहेत. आमच्या सर्व प्रमुख योजनांनी गरिबांच्या जीवनात परिवर्तन घडवले आहे. पीएम आवास योजना, पीएम उज्ज्वला योजना, जन धन योजना आणि आयुष्मान भारत यांसारख्या उपक्रमांनी गृहनिर्माण, स्वच्छ स्वयंपाकाचे इंधन, बँकिंग आणि आरोग्यसेवेची उपलब्धता वाढवली आहे. थेट लाभ हस्तांतरण (DBT), डिजिटल समावेशकता आणि ग्रामीण पायाभूत सुविधांवर भर दिल्याने शेवटच्या घटकापर्यंत लाभांचे पारदर्शक आणि जलद वितरण सुनिश्चित झाले आहे.

यामुळेच 25 कोटींहून जास्त लोकांनी गरिबीवर मात केली आहे. जिथे प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जीवन जगण्याची संधी मिळेल अशा समावेशक आणि स्वयंपूर्ण भारताची निर्मिती करण्यासाठी एनडीए वचनबद्ध आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भारताला कोणत्याही तिसऱ्या पक्षाची गरज नाही, राहुल गांधींच्या विधानावर थरूर यांची प्रतिक्रिया
Next Article नागरिकांनी पर्यावरण संवर्धनासाठीचे कार्य नव्या जोमाने सुरु करावे – पंतप्रधान

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?