नवी दिल्ली, 5 जुलै (हिं.स.) :
भारतीय
महिला संघ इंग्लंडमध्ये टी-२० मालिका जिंकून इतिहास रचण्यास अपयशी ठरला आहे.
दोन्ही संघांमधील ५ सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हल
येथे खेळवण्यात आला. चांगली सुरुवात केल्यानंतरही इंग्लंड संघाची चांगलीच हार
झाली. भारतीय गोलंदाजांनी २५ चेंडूत इंग्लंडचे ९ बळी घेतले होते. मात्र, तरीही
भारतीय संघाने ५ धावांनी हा सामना गमावला.
नाणेफेक
जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर इंग्लंडची सुरुवात वादळी झाली.
सलामीवीर सोफिया डंकले आणि डॅनिएल वॅटने १३७ धावांची सलामी भागीदारी केली. १६ व्या
षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर दीप्ती शर्माने सोफियाला ७५ धावांवर झेलबाद केले. यानंतर
विकेट पडायला सुरुवात झाली. इंग्लंडने २५ चेंडूत ९ विकेट गमावल्या.
१७२
धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाला निर्धारित षटकांत ५ गडी
गमावून फक्त १६६ धावा करता आल्या. सलामीवीर स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी
८५ धावांची भागीदारी केली. वर्मा अर्धशतक झळकावू शकली नाही. तिने २५ चेंडूत ४७
धावा केल्या. दरम्यान, ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ २-१ ने आघाडीवर
आहे. आता पुढचा सामना जिंकत हरमनप्रीतचा संघ मालिकेत विजयी आघाडी घेण्याची
प्रयत्नशील असेल.