Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?

admin
Last updated: 2025/06/25 at 4:48 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अमरावती, 25 जून (हिं.स.)

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सत्तांतरानंतर शेतकऱ्यांसाठी प्रभावी योजना राबविल्या जात असतानाच आता विरोधकांकडून माजी आमदार तथा बँकेचे विद्यमान अध्यक्ष बच्चू कडूंना बँकेच्या अध्यक्षपदावरून हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर आरोप जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांनी केला आहे. विशेष म्हणजे या हालचालींमागे राज्य शासन आणि काँग्रेसमधील छुपी युती असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या बँकेवर काँग्रेसची मक्तेदारी राहिली आहे ,दोन वर्षांपूर्वी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सत्तांतर झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी अनेक लाभदायक योजना बँकेमार्फत राबवल्या गेल्या. परंतु यामुळे बँकेवरील विरोधकांची मक्तेदारी संपल्याने, त्यांच्याकडून सातत्याने कारवाया सुरू असल्याचा आरोप बँकेच्या सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे.दरम्यान, विभागीय सहनिबंधकांनी नाशिक येथील न्यायालयाच्या शिक्षेचा संदर्भ देत बच्चू कडू यांना संचालक पदाकरिता अपात्र ठरवले असून, या निर्णयाविरोधात बच्चू कडू यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

न्यायालयाने त्यांना दिलासा देत विभागीय सहनिबंधकांचे आदेशावर स्थगिती दिली आहे.बच्चू कडू यांच्या माध्यमातून शेतकरी व दिव्यांग व सर्वसामान्यांच्या मागण्यांसाठी शासनावर दबाव टाकल्या जात आहे याचाच वचपा काढण्याकरिता त्यांना बँकेचे अध्यक्ष पदावरून काढण्याची प्रकार म्हणजे” राज्य शासन आणि काँग्रेसचा नियोजित कट आहे. राज्य शासनाच्या दबावाखाली घेतलेले निर्णय आहेत. काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनांपेक्षा बँकेवरील सत्ता अधिक महत्त्वाची वाटते,” असा थेट आरोप पत्रकार परिषदेतून करण्यात आलेला आहे. “आमचा संघर्ष हा केवळ सत्तेसाठी नसून, शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी आहे. तो संघर्ष आम्ही शेवटपर्यंत लढणार,” असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

अध्यक्ष व बच्चू कडू यांच्या नेतृत्वात घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय

कर्ज वाटपामध्ये बँकेने मागील दोन वर्षांमध्ये बँकेला दिलेल्या लक्षांकाच्या एकूण 104% पूर्तता केलेली असून सन 2023 मध्ये रुपये 589 कोटी तर सन 2024 ला 647 कोटीचे वाटप केलेले आहे व यावर्षी सुद्धा 611 कोटीचे वाटप पूर्ण झाले असून सप्टेंबर 2025 पर्यंत बँकेला 750 कोटी कर्ज वाटपाचे लक्षांक आहे दोन वर्षाच्या काळामध्ये बँकेने शेतकरी हिताच्या व शासनाची सबसिडी असलेली एन एल एम, सौर ऊर्जा कर्ज योजना, एज्युकेशन लोन,गोडाऊन कर्ज योजना ,नेट शेड या योजना नव्याने सुरू केलेल्या आहे,

You Might Also Like

रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट

सासवड पालिकेतर्फे पालखीचे जोरदार स्वागत

मुंबई विमानतळावर थायलंडहून आलेला 25 किलो गांजा जप्त

नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश

वारकरी भक्तीयोग’कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्वांनी पुढाकार घ्यावा – चंद्रकांतदादा पाटील

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का

Latest News

‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
न्यायाबरोबर निसर्गाचे रक्षण देखील सामाजिक जबाबदारी – सत्र न्यायाधीश अंजू शेंडे
देश - विदेश June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?