Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आली लहर, केला कहर ! सासरचे झोपलेले, जावयाने पेट्रोल टाकून घरच पेटवून दिले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारी

आली लहर, केला कहर ! सासरचे झोपलेले, जावयाने पेट्रोल टाकून घरच पेटवून दिले

Surajya Digital
Last updated: 2020/11/03 at 7:24 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : सासऱ्याचे घर पेटवून दिल्याप्रकरणी मुंबईतील मुलुंड पोलिसांनी २९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. यात मेहुणा ३५ टक्के होरपळला आहे. तर घरात असलेले पत्नीचे आई-वडील, दोन बहिणी आणि पाच वर्षांचा भाचा किरकोळ जखमी झाला आहे. पत्नीने घरी येण्यास नकार दिल्याच्या रागातून जावयाने हे कृत्य केले आहे. यात जावयास अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल पोळ असे आरोपीचे नाव आहे. त्याची पत्नी आरती हिने घरी नांदायला येण्यास नकार दिला होता. काही दिवसांपूर्वी ती आपल्या माहेरी मुलुंडमधील इंदिरा नगर परिसरात राहायला आली होती. पत्नी घरी येत नसल्याच्या रागातून राहुलने घर पेटवून दिले. पोलिसांनी त्याला हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आरोपीला दारूचे व्यसन होते. दारू पिऊन घरी आल्यानंतर तो पत्नीला मारहाण करायचा. नालासोपारा येथील स्थानिक पोलीस ठाण्यात तिने राहुलविरोधात तक्रारही दाखल केली होती. त्यानंतरही तो मारहाण करायचा. नेहमीच्या छळाला कंटाळून अखेर आरतीने माहेर गाठले.

२५ ऑक्टोबर आणि २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री सासरची मंडळी घरात झोपली होती. त्याचवेळी राहुल तेथे आला. त्याने घराच्या दारावर पेट्रोल ओतले आणि पेटवून दिले. यात त्याचा मेहुणा प्रकाश हा होरपळला. तो दरवाजाजवळच झोपला होता. तो ३५ टक्के भाजला आहे. तर दोन मेहुण्या आणि पाच वर्षांचा भाचा किरकोळ जखमी झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

* असे जुळले प्रेम

राहुल हे शिवणकाम करतो. एका दुकानात काम करत असताना, त्याची ओळख आरतीशी झाली. वर्षभरापूर्वी त्या दोघांनी लग्न केले. पोळ आणि आरती काही महिने धारावीत राहिले. त्यानंतर ते नालासोपारा येथे राहायला गेले. सासरच्या लोकांच्या मदतीने त्याने टेलरिंगचे दुकान सुरू केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

You Might Also Like

आयुष कोमकर हत्या : आजीसह आणखी तिघांना गुजरातमधून अटक

मोर्शी एसडीओंच्या खाजगी कारमधून पिस्तूल चोरी; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

दिल्लीमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची पार्किंग वादातून हत्या

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

TAGGED: #नांदण्यास #जावयाने #लहर #कहर #पेट्रोल #घर #पेटवून
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शरद पवार गोव्याला खासगी दौ-यावर; गोव्यात भाजपविरोधी मोट बांधू शकणार का ?
Next Article महिला घराबाहेर पडल्या आणि मिटूची समस्या सुरु झाली; ‘शक्तीमान’ खऱ्या आयुष्यातला ‘किलविश’ निघाला

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?