Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नवे अभियान ‘कर्म मराठा, धर्म मराठा, जोडो मराठा’; इचलकरंजी सकल मराठा समाजाची बांधणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

नवे अभियान ‘कर्म मराठा, धर्म मराठा, जोडो मराठा’; इचलकरंजी सकल मराठा समाजाची बांधणी

Surajya Digital
Last updated: 2020/11/24 at 7:24 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

कोल्हापूर : खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण एकत्र आलो आहोत. कर्म मराठा, धर्म मराठा हे ब्रिदवाक्य घेऊन मराठा जोडो अभियान सुरू करण्यात येणार असल्याची माहिती इचलकरंजी सकल मराठा समाजाचे प्रवक्ते पुंडलिक जाधव आणि शहराध्यक्ष पै. अमृत भोसले यांनी दिली.

इचलकरंजी शहरामध्ये आज मराठा समाजाचे आरक्षणासह अन्य न्याय हक्कांसाठी वेगवेगळे लढण्याऐवजी सर्वांनी एकजुटीने ताकदीने हक्क मिळविण्यासाठी कार्यरत झालो असल्याचेही सांगितले. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील सर्वच मराठा संघटनांना एकत्र करून इचलकरंजी सकल मराठा समाजाची बांधणी केली आहे. त्याची कार्यकारिणी आज मंगळवारी पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* मराठा जोडो अभियानांतर्गत कामे

मराठा जोडो अभियान अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासह समाजासाठी विकासात्मक कामे करणे, समाजातील नवयुवकांसाठी शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात काम करणे, सर्वच विभागाचे परीक्षण करुन विभागनिहाय कमिट्या तयार करणे, 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना सामावून घेऊन कार्यरत राहणे या उदात्त हेतूने शहर आणि परिसरातील सर्व मराठा समाजबांधवांना व संघटनांना एकत्र केले आहे. आरक्षणाच्या लढ्याला बळ देण्यासह सर्वांनी एकजुटीने कार्यरत राहण्यासाठी ही कार्यकारिणी करण्यात आली आहे.

* अशी आहे कार्यकारिणी

सकल मराठा समाज इचलकरंजी शहर अध्यक्षपदी पै. अमृत भोसले, कार्याध्यक्षपदी मोहन मालवणकर तर उपाध्यक्षपदी अमरजित जाधव, अरविंद माने, खजिनदारपदी भारत बोंगार्डे, सचिवपदी शशिकांत मोहिते, सहसचिवपदी वैभव खोंद्रे यांची आणि सदस्यपदी रणजित जाधव, किसन शिंदे, राजवर्धन नाईक, नितीन कोकणे, नितीन पाटील, मनोज साळुंखे, शहाजी भोसले, संतोष सावंत, प्रमोद खुडे, विठ्ठल येसाटे, प्रसाद जाधव, नागेश पाटील, गणेश जाधव, उदय निंबाळकर, किशोर निंबाळकर, अजित शिंदे, अभिजित रवंदे, दिलीप पाटील शिवाजी पाटील व सागर कचरे यांची निवड करण्यात आली आहे.

प्रवक्तेपदी पुंडलिक जाधव, पै. अमृता भोसले, मोहन मालवणकर आणि दीपक रावळ यांची तर सिव्हिक बोर्डात आबा जावळे, पुंडलिक जाधव, उदय लोखंडे, आनंदराव नेमिष्टे, बंडोपंत लाड, प्रकाश मोरे, प्रकाश मोरबाळे, सुनील शेलार, संजय जाधव, सचिन हळदकर, राजाराम बोंगार्डे व रवींद्र माने यांची निवड करण्यात आली आहे.

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

TAGGED: #नवेअभियान #कर्ममराठा #धर्ममराठा #जोडोमराठा #इचलकरंजी #सकलमराठा #समाजाची #बांधणी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पुन्हा सत्ता मिळत नाही म्हणून ईडीची कारवाई; माजी मंत्री गायकवाडांचा एनसीपीत प्रवेश
Next Article पाकिस्तानामधील व्यवसाय बंद करण्याची फेसबुक – गुगलची धमकी, राष्ट्रीय सुरक्षितेसाठी धोक्याचे कृत्य

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?