पलक्कड, 05 एप्रिल (हिं.स.) : केरळच्या पलक्कड येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी श्रीनिवासन यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य हल्लेखोराला एनआयएने अटक केली आहे. शमनद असे आरोपीचे नाव असून तो गेल्या काही वर्षांपासून फरार होता.
यांदर्भात एनआयएच्या सूत्रांनी सांगितले की, श्रीनिवासन हत्या प्रकरणात शमनद ई के उर्फ शमनद इलिक्कल हा मुख्य आरोपी असून तो गेल्या 3 वर्षांपासून फरार होता. त्याला अटक करण्यासाठी 7 लाख रुपयांचे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले होते. इलिक्कलविरुद्ध इतर अनेक गुन्हे देखील दाखल आहेत. आरोपी बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) च्या संरक्षणाखाली होता आणि संघाचे पदाधिकारी श्रीनिवासन यांच्या हत्येपासून तो गुप्त ओळखीने राहत होता. धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने पीएफआय नेते आणि कार्यकर्त्यांनी सप्टेंबर 2022 मध्ये हत्येचा कट रचला होता.