Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: समाजमाध्यमांवर पाकिस्तान झिंदाबादचा मजकुर, कोंढवा पोलिसांकडून तरुणीला अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

समाजमाध्यमांवर पाकिस्तान झिंदाबादचा मजकुर, कोंढवा पोलिसांकडून तरुणीला अटक

admin
Last updated: 2025/05/10 at 4:32 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

पुणे, 10 मे (हिं.स.)।

पुण्यात राहणाऱ्या एका तरुणीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ असे स्टेटस ठेवत भारताविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खतीजा शहाबुद्दीन शेख (१९, रा. कौसरबाग, कोंढवा) असे गुन्हा दाखल झालेल्या युवतीचे नाव आहे.

याप्रकरणी पोलीस हवालदार सुभाष महादेव जरांडे यांनी फिर्याद दिली आहे. तिच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम १५२, १९६, १९७, २९९, ३५२, ३५३ अन्वये कायदेशीर फिर्याद आहे.

गुन्हा दाखल करताना धर्म, समूह यांच्यामध्ये शत्रुत्व व द्वेषाची भावना वाढेल, तसेच भारत देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेला बाधक ठरेल व सार्वभौमत्व, एकता व अखंडता धोक्यात आणणारी कृती होईल अशा दृष्टीने वरील मेसेज बुध्दीपुरस्सर प्रसारीत करुन विव्देषपुर्वक कृत्य केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, खतिजा ही सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेत होती. मात्र या प्रकारानंतर तिला महाविद्यालयाने काढून टाकले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युद्धजन्य परिस्थितीत समाज माध्यमात तेढ निर्माण करणारे, तसेच अफवा प्रसारित करणाऱ्या संदेशांवर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात असल्याचे पोलिस प्रशासनाने यापूर्वीच जाहीर केलेले आहे. शुक्रवारी दुपारी पोलीस कर्मचारी जरांडे हे पोलिस ठाण्यात हजर होते.त्यावेळी संबंधित तरुणीच्या समाजमाध्यमावर पाकिस्तान झिंदाबाद असा मजकूर प्रसारित झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तिच्या या मजकुरामुळे समाजमाध्यमात तेढ निर्माण होऊ शकते असे लक्षात आल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

You Might Also Like

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत

राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article डॉ. वळसंगकर आत्महत्या : पोलिसांनी पुन्हा मागितली मनीषाची कोठडी !
Next Article उज्जैनला देवदर्शनाला निघालेल्या खासगी बसला अपघात, कोल्हापूरातील तिघांचा मृत्यू

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?