Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: किर्ती गोल्ड तेलाचा टँकर पळवून नेणाऱ्या तिघांना लातूर जिल्हा न्यायालयाने सुनावली जन्मठेप
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारी

किर्ती गोल्ड तेलाचा टँकर पळवून नेणाऱ्या तिघांना लातूर जिल्हा न्यायालयाने सुनावली जन्मठेप

Surajya Digital
Last updated: 2020/08/22 at 9:10 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

लातूर : चालकाला मारहाण करून व त्याचे हातपाय व तोंड बांधून तेलाचा टँकर पळवून नेणाऱ्या तिघांना जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.  २०१४  मध्ये उजनीमोडवर (ता. औसा) मध्यरात्री ही जबरी चोरीची घटना घडली होती. अशा गुन्ह्यात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ असून निकालामुळे जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगारावर चांगलाच वचक बसण्याची शक्यता आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

येथील किर्ती गोल्ड कंपनीच्या तेलाचा टँकर घेऊन चालक बलभीम कासवीद (वय ५४, रा. टेंभूर्णी, जि. सोलापूर) हा ४ मार्च  २०१४  रोजी बोरामणी (सोलापूर) येथे निघाला होता. टँकरमध्ये १६ हजार ९९० किलो कॉटन रिफाइंड तेल होते. पुण्यात वास्तव्यास असलेल्या सुरेश शेषराव साठे (वय ३१, रा. नांदुर्गा, ता. औसा), शाम विश्वनाथ शिंदे (वय ३५) व संदीप सौदागर भोजन (वय २३, दोघे रा. आशिव) या तिघांनी टँकर पळवून नेण्याच्या उद्देशाने एमआयडीसी मधूनच छोटा हत्ती वाहनाने टँकरचा पाठलाग सुरू केला.

मध्यरात्री साडेबारा वाजता उजनीमोडवर छोटा हत्ती आडवा लाऊन टँकरला गाठले व चालक कासवीद याला हॉकी स्टिक व लोखंडी रॉडने मारहाण केली. त्याचे हातपाय बांधून व तोंड चिकटपट्टीने बंद करून तांदुळवाडी (ता. उस्मानाबाद) शिवारातील शेतातील पिकात फेकून दिले आणि टँकर पळवून नेला. स्वतःला तेल विक्री करणारे दलाल भासवून पंधारे (ता. बारामती) एमआयडीसीत या तेलाची विक्री केली. चालकाने सुटका करून घेत पोलिस ठाणे गाठले.

त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. तत्कालीन पोलिस अधीक्षक बी. जी. गायकर व अपर पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी या प्रकरणात लक्ष घातले. त्यानंतर प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या प्रकरणाचा तपास केला. यात  सहायक सरकारी वकील अॅड. लक्ष्मण एन. शिंदे यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले.

You Might Also Like

आयुष कोमकर हत्या : आजीसह आणखी तिघांना गुजरातमधून अटक

मोर्शी एसडीओंच्या खाजगी कारमधून पिस्तूल चोरी; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

दिल्लीमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची पार्किंग वादातून हत्या

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

TAGGED: #किर्तीगोल्ड #जन्मठेप #लातूर #न्यायालय
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article श्री गणेशाच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी प्रवीण तरडेंनी निर्माण केला वाद; काय झाले वाचा सविस्तर
Next Article मोहोळ शहरातील घागरे वस्तीवर भरदिवसा बिबट्याचा शेळीवर हल्ला; हुसकावण्यासाठी फोडले फटाके

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?